एक आक्टेबर हा जेष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा केला जातो भारतात ६० वर्षांवरील नागरिकांची संख्या एकूण लोकसंख्येच्या ७५/ टक्के म्हणजेच ज्येष्ठांची संख्या अंदाजे (९) कोटी सत्तर लाखांपेक्षा जास्त आहे महाराष्ट्रात (२००१ मधील आकडेवारी नुसार ) ८४.५ लाख जेष्ठा पैकी ३९/ लाख (४६.५/टक्के ) पुरूष व ४५ लाख (५३.५/टक्के ) स्त्रिया आहेत साधारणपणे जेष्ठ स्त्रियांमध्ये विधवांचे प्रमाण ५०/टक्के व विदुरांचे प्रमाण २५/ टक्के आहे ग्रामीण भागात ६०/ वर्ष वयानंतर काम करणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण ३७/टक्के एवढे आहे
सेवानिवृत्ती नंतर. सामाजिक. /कौटुंबिक / स्नेहबंध माणसिक स्वास्थ्य. / शारीरिक आरोग्य / समृद्ध ठेवण्यासाठी आनंदी जीवन जगण्यासाठी काही माहिती व टिप्स पाठवत
(१) निवृत्ती म्हणजे नोकरी /व्यवसायातून निवृत्ती जीवनातून नव्हे जे आवडते ते नोकरी व व्यवसाय काळात करता आले नाही ते करण्याची संधी म्हणजे निवृत्ती हा पूर्ण विराम नसून एक स्वल्प विराम आहे आयुर्मान वाढल्याने अजून बरेच आयुष्य बाकी आहे
(२) वार्धक्यातही. 'अजून यौवनात मी ' या सकारात्मक जगण्याचा दृढ निश्चय करा नियती आणि निश्चिचय याची सांगड घातल्याशिवाय निर्मिती होत नाही
(३) स्वताच्या आत्मसन्मान. / अस्तित्व. / आणि स्वताचे सुख. / स्वताचे आरोग्य / हे सर्व अबाधित ठेवण्यासाठी स्वताला. सक्षम ठेवावे. विशिष्ट जेष्ठ नागरिक संघटना संस्था स्थापन कराव्यात. समवयस्क लोकांनी एकत्र यावे सृजनशील कार्य करावे आणि आपली जीवनसंधया आनंदी करावी
(४) निवृत्ती नंतरचा विचार निवृत्ती पूर्वी करणे आवश्यक आहे
(५) सेवानिवृत्ती लाभाची योग्य आपल्यासाठी गुंतवणूक करा उतारतया वयात. आजार / पर्यटन / धार्मिक कार्य / इ साठी कामी येणेसाठी त्याचे नियोजन करा
(६) निवृत्ती पूर्वीच्या नोकरीमध्ये आलेला अनुभव त्या क्षेत्रातील ज्ञान याचा फायदा करून घेवून निवृत्ती नंतर अर्धवेळ काम करा छोटासा गृह उद्योग काढू शकता
(७) नवीन गोष्टी शिकण्याची / करून बघण्याची आवड ठेवा / एकादी कला. / वैयक्तिक कौशल्य. याच शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्या तुम्हाला आवडेल तो छंद जोपासा.
(८) कुटुंबात वावरताना स्वस्त भावात आवश्यक असा बदल करणे गरजेचे आहे हे सत्य मनी जाणून घ्या सल्ला देणे / मुला/ सुनांचया निर्यात विनाकारण मध्यस्थी करणे / हेकेखोर पणे वागणे / एकटे पुटपुटने / जोरात बोलणे / कुटुंबातील लोकांकडून अवास्तव अपेक्षा बाळगणे इ गोष्टी बदलाव्या लागतात दुसर्याच्या स्वभाव बदलाणयापेक्षा सर्वांमध्ये बदल करा
(९) आपल्या तनमनाचे आरोग्य सांभाळण्यासाठी सर्वांची आदर्श कशी दिनचर्या / फिरणे / प्राणायाम / व्यायाम / खेळ / उत्तम आचार विचार / चांगल्या गुणी व आदर्श मित्रांचा सहवास / यशस्वी लोकांचा सहवास / संगीत करमणूक /नवनवीन शिकण्याची आवड / इ गोष्टी स्वताच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी व फुलविणयासाठी संधीचा फायदा करून घ्यावा
(१०) स्वताची मिळकतीची कुवतीनुसार कौटुंबिक जबाबदारी घ्यावी
(११) मोठेपणाने व सामंजस्याने वागून आपल्या वागण्यामुळे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडणार नाही याची काळजी घ्यावी सर्वांशी प्रेमाने वागा. आपल्या वागण्याचा. बोलण्याचा. वावरण्याचा त्रास कोणालाही होणार नाही याची पुरेपूर काळजी घ्यावी
(१२) कुटुंबातील इतरांना आपलीं भीती न वाटता आदर व प्रेम वाटेल असे वागा. तसेच भविष्याकडे वेगाने निघालेल्या या पुढील पिढीला संस्काराचे ब्रेक आणि प्रेरणेचे इंधन दिले पाहिजे
(१३) मनात घालमेल न ठेवता स्पष्ट बोला रोजचा आपल्यामुळे कलह. भांडण होत असेल तर मुला " सुनापासून चार घर दुरच रहा
(१४) एकटेपणा जाणवत असेल तर समवयस्क / समछंदिषट. ग्रुप करावेत अशा मनाला आनंद देणारया ग्रुप मध्ये सहभागी व्हावे
(१५) निवृत्ती नंतर आलेला पैसा व भावी खर्च याचा ताळमेळ आखावा वार्धक्यात आजार शस्त्रक्रियेकरिता अचानक उद्भवणाऱे खर्च मुला मुलींचे विवाह या महत्वाच्या बाबींसाठी लागणारी आर्थिक तरतूद लक्ष्यात घेऊन तो पैसा बाजूला काढावा भावनेच्या भरात. व अंध प्रेमापोटी "पुढयातले ताट आणि बसायचे ताट " मुलांना व कोणत्याही नातेवाईक यांना देवू नका कारण "ठणठणगोपाळ " असेलतर कोणी विचारत नाही
(१६) निवृत्ती नंतर घरात अधिक लक्ष देवू नये आवश्यकतेनुसार देणे लाभदायक ठरते अन्यथा ते इतरांना खुपते
(१७) निवृत्ती नंतर उतारतया वयात करावी लागणारी कामे समजून घेवून आनंदाने ती केल्यास दोन गोष्टी साध्य होतात तुमचे व तुमच्या मुले सुना यांच्यामधील संबंध दृढ होतात कुटुंबाची प्रगती निश्चित होते परंतु काही कामे आपणास नकोशी वाटत असतील तर त्याबद्दल स्पष्ट बोलून नकार द्यावा
(१८) सुनेचा वाढदिवस. लग्नाचा वाढदिवस. काही विशेष प्रसंग इ लक्षात ठेवून तिला आवडत्या वस्तू. भेटवस्तू द्यावी तू आमची मुलगीच आहेस. असे बोला
(१९) नातवंडे हा आजी आजोबा यांचा विरंगुळा असतो जीव की प्राण असतो त्यांच्यावर जिवापाड प्रेम करा आपल बालपण नातवंडांच्या समवेत संगतीत परत अनुभवा
(२०) घरात लहान मूल असताना मुलांचे आई-वडील मुलांच्या प्रगतीसाठी ज्या दिशेने प्रयत्न करतात त्याच दिशेने आजी आजोबा यांनीही त्यासाठी प्रयत्न करावेत आजी आजोबा नातवंडांचे लाड मुलांच्या आई बाबांच्या शिस्तीच्या आड येता कामा नये
(२१) आत्ता काय वार्धक्य आले सारे संपले आजार होणारच राहिले तेवढे दिवस जसे असेल तसे काढायचे ही नकारात्मक आधी बंद करा आपल्या लग्नाच्या सुरुवातीचे दिवस आठवा तुम्ही दोघेच होता तेव्हा. आजही तुझी दोघेच आहात सारे नकारात्मक विचार सोडून नव्याने एकामेकाचा सविकार करा आता थोड मोल्ड व्हा एकामेकाना पुरक व्हा आहार. / आरोग्य / औषध उपचार / पर्यटन / गप्पा / वाचन / याद्वारे एकामेकाची काळजी घेवून आनंदी रहा
(२२) आत्ता तर मी फक्त माझ्यासाठी जगणार अशा ताजा आनंदी हिरव्यागार मनाने प्रत्त्येक क्षण जगा
(२३) संगीताची जादू अनोखी आहे रोज भजन कीर्तन करा भावगीते/ श्लोक / स्त्रोत / फिल्मी संगीत /जुनी गाणी / स्वास्थ संगीत / पक्षांचे आवाज / समुद्राची साज / यांचे कॅसेट ऐका
(२४) रुग्ण सेवा / गोरगरीबांची सेवा / गरजूंना मदत / अशी समाजकार्य करा रक्ताची व रक्ताच्या पलीकडची नाती जपा आणि आपले वार्धक्य आनंदी करा जात / धर्म / लिंग / वय / यांच्या बंधनापेक्षा ही रक्ताच्या नात्यापलीकडची नाती वार्धक्यात तुम्हाला सुखद क्षण देऊ शकतील जगण्याला व आनंदाची झालर येईल
(२५) कठोर बोलण्यापेक्षा अबोल रहा छोटी ठीणगी स्फोट घडवून आणते विचारपूर्वक बोला विचारपूर्वक वागा
(२६) घरात पती/ पत्नी / मुल /सुना / सासू सासरे/ कोणाचीही एकाधी गोष्ट पटत नसेल तर त्याबद्दल स्पष्ट बोला जे बोलताय ते सामंजस्य ठेवून बोला तरच तुमच्या बोलण्याचा योग परिणाम होईल अन्यथा वाद वाढेल कमीत कमी अपेक्षा ठेवणे व जास्ती जास्त सामंजस्य ठेवणें गरजेचे आहे
(२७) रागांचा पारा अचानक वाढला तर उच्चरक्तदाब / ह्रदयविकाराचा. असा त्रास होतो रक्तदाब अचानक वाढला असता मेंदूत रक्तस्त्राव होतो हार्ट अॅटेक येवू शकतो
(२८) चंद्र प्रकाश हवा असेलतर सुर्याने मावळायला हवे
(२९) उतारते वय एक नियम कटाक्षाने पाळा कुठेही गेला तरी आरोग्य विषय काढून समुदखी शोधायचा नाही मुला/ सुनाना थोडस खटकल तरी स्वताचे दुःख खरवडून काढायचे नाही
(३०) अध्यात्मात मानसिक आरोग्य चांगले राहते धार्मिक /! वाचन /चित्रपट /सीडी / यांच्या द्वारे आवडत्या भगव़ताला आवळून भकतिसार आंनंद घ्यावा क्षमा / शांती / बंधुत्व /सत्व /जेथे आहे तेथे परमेश्वर आहे
(३१) वार्धक्यात एखाद्या व्यक्तिला मनमोकळे करायला कोण नसल्यास ती व्यक्ती टिव्ही समोर रमते
(३२) आपल्याला काही महत्व नाही आपल्या विरोधात काही कारस्थान शिजतंय असा नकारात्मक विचार आल्यास घरातल्या इतरा सोबत वारंवार खटके उडतात
(३३) आपण परगावी जात असल्यास इतरांसोबत त्याबाबत चर्चा करू नका
(३४) विश्वास पात्र नोकरच असावेत. नोकरासमोर पैसा दाग दागिने. महत्वाची कागदपत्रे हताळणी करू नये
(३५) दारावरची बेल वाजलयास घाईने दरवाजा उघडू नये खात्री करा कोण आहे
(३६) तुमच्या मुलांचा मुलींचा अपघात झाला आहे असे कोणी म्हटले तर त्यांच्या सोबत जाऊ नका
(३७) दारावर दागिणे पाॅलिश करून देणारे ठग लोक तुम्हाला लूटू शकतात कशा लोकांना दारात सुध्दा उभे करू नका. अंधश्रद्धेचा / बुवाबाजी / यांच्या नादी लागू नका
(३८) रस्त्यावरून जाणाऱ्या वृध्द स्त्रियांना खोटे नाटे सांगून लूटणारे लोक आहेत अशा वयवृध स्त्रियांनी दाग दागिने घालू नये चुकीचे फोन / अनोळखी व्यक्ती वारंवार घराजवळ फिरणे. / दारावरची बेल सतत वाजणे /याकडे दुर्लक्ष करू नका त्वरित पोलिस स्टेशनला संपर्क साधा
(३९) चांगले शेजारी असतील तर वेळ पडल्यास त्यांची मदत घ्या अनोळखी व्यक्तीबरोबर जाणे / फोनवर बोलणे /वैयक्तिक माहिती देणे इस्टेटसंदरभात माहिती देणे टाळा
(४०) प्रवासात अनोळखी व्यक्तीशी बोलू नये
(४१) शारीरिक आरोग्याला काही तक्रारी असतील तर गांभिर्याने डॉ पत्ता. फोन नंबर. डॉ नाव. हे आपल्या जवळील डायरी मध्ये लिहून ठेवा
(४२) स्वताला स्वता जपा शारीरिक मानसिक भावनिक आरोग्य जपण्याचा प्रयत्न करावा वेळ पडल्यास औषध उपचार करावा
(४३) हल्ली अनोळखी व्यक्ती यांच्या पेक्षा नातेवाईक व आपली मुले यांचे पासून सुध्दा धोका खाऊ शकतात
(४४) हताश होऊन आत्महत्या विचार करु नका
(४५) अन्न/ वस्त्र / निवारा / आरोग्याची काळजी / मुलभूत गरजा भागविण्यासाठी. आई वडील जेष्ठ नागरिक यांचा चरितार्थ व कल्याणार्थ अधिनियम. "२००७" व महाराष्ट्र आई वडील चरितार्थ आणि जेष्ठ नागरिक चरितार्थ व कल्याणार्थ नियम "२०१०" मधील नियम "१४" नुसार १०००० प्रतिमहा निर्वाह भत्ता मिळू शकतो नियम. "२०" अन्वये जिल्हा पोलिस अधीक्षक हे जेष्ठ नागरिकांच्या जीवीताचे व मालमत्ता रक्षण करण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करतील असे कायद्याचे संरक्षण जेष्ठ नागरिकांना आहे
(४६) गरजेचे ठरल्यास आनंदाने वृद्धाश्रम सविकारणे पर्याय उपयुक्त ठरतो छळापेक्षा ते परवडले
(४७) आपले वार्धक्य. / आपल्या गरजा / आपले आजार / आणि आपले उर्वरित आयुष्य याचा विचार करून सर्व प्रापटी / पैसा / मुलांच्या हातात देऊ नका कागदपत्रे न वाचता सह्या करु नका
(४८) आपल्या मृत्यूनंतर आपल्या संपत्तीची विल्हेवाट कशी व्हावी याचे ईच्छा पत्र तयार करा
(४९) वार्धक्यात आर्थिक स्वावलंबन घालवू नका. आजपर्यंतच्या तुमच्या कमाईवर तुमचा अधिकार आहे
(५०) प्रदेशात स्थायी झालेल्या मुलांकडे राहण्यास जाण्याचा निर्णय पूर्ण विचारांती घ्या
(५१) जीवनात कळत नकळत आपणाकडून काही व्यक्ती दुखावल्या असू शकतात त्यांच्याशी अबोला असेल तर स्वताहून बोला दुस-याला मानसन्मान द्या. त्यामुळे तो वाढण्याची शक्यता जास्त असते
(५२) फिट राहण्यासाठी रोज सकाळी व्यायाम करा. / ध्यानधारणा / ओंकार जप / रिलॅकसेशन रोज रहा / सकाळ संध्याकाळ मोकळ्या हवेत फिरा / बागेत जा /
(५३) वाढत्या वयात हलका सकस आहार घ्यावा / आहाराचे प्रमाण समान ठेवा / मद्यपान / तंबाखू / सिगारेट / व्यसन सोडा
(५४) झोपण्यापूर्वी. आवडते वाचणं / भक्तिगीते / संगीत / गाणी / यांचा आस्वाद घ्या
(५५) आवश्यक तेवढी विश्रांती घ्या / झोप घ्या / जागरण करु नका
(५६) प्रकृतिसाठी डॉ यांचेकडे गेल्यावर कुठल्या औषधाने / आहाराने / अॅलरजी रिअकसन आली / तर उपचार घेण्याअगोदर डॉ यांना सांगा
(५७) औषधाचा ढोस / औषधवेळ / मनाप्रमाणे बदल करू नका औषधे रोजची म्हणून अंधारात घेवू नका
(५८) औषधे मुलांच्या पासून लांब ठेवा
(५९) हसणे. खळखळून हा आरोग्य राखण्याचा खरा मंत्र आहे म्हणून खळखळून हसा
(६०) वार्धक्यात. / मधुमेह / उच्चरक्तदाब / ह्रदयविकाराचा झटका / पक्षाघात / संधीवात / मोतीबिंदू / वृद्धत्व / कंपवात / कर्णबधिरता / किडणी स्टोन / मुतखडा / बद्धकोष्ठता / विसावभोळेपणा / शस्त्रक्रिया / अतिसार / इ आजार उद्भवतात त्यामुळे डॉ सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेवू नका
आपण बघतो ज्या लोकांनी आपल्या आयुष्यातील ३५/४० वर्षे एखाद्या आॅफिस मध्ये घालवली आपल्या पेक्षा मोठ्या साहेबांची चाकरी केल्यासारखी कामे केली आणि एक वेळ ६० वर्षांनी निवृत्ती झाली शासनाने ठरवून दिलेला निवृत्ती वेतन योजनेतून आलेला आपणच आपल्या साठी ठेवलेला थोडाफार पैसा येथून पुढचे आयुष्य जगण्यास मिळाला काहीना मिळाला काहीजण वाट बघत आहेत
आपल्याला ज्या आई वडील यांनी जन्म दिला आपणास मोठें केले जेव्हा त्यांचे हातपाय थकले त्यावेळी आपण त्यांना पहिल्यासारखी किंमत देतो का ? नाही आपण आपणास आपले म्हातारे आई वडील सांभाळायचे जड होतात आणि आपण त्यांना वृधश्रमाचा रस्ता दाखवतो आपणास लाज नाही वाटत ?
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
वाचा -