कुस्ती खेळाडू पै.वेदात पानसरेची हरियाणाला घोडदोड



कुस्ती खेळाडू पै.वेदात पानसरेची हरियाणाला घोडदोड



शेवगाव प्रतिनिधी / अक्षय केदार


नुकत्याच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत झालेल्या स्पर्धेतील निवड चाचणी मधून आपापल्या गटांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करत राष्ट्रीय कुस्तीपटू पै.वेदांत पानसरेनी आपले कुस्ती कौशल्य दाखववून दोन राऊड काढून पुढे यशस्वी चाल केली आहे. वेदांत हा बी.टेक ऍग्री चा विद्यार्थी आहे. त्याने यापूर्वी राष्ट्रीय पातळीवर मिडल्स मिळवलेले आहेत. आताही त्याच उद्देशाने

 जय्यत तयारी करून उत्तर प्रदेशात हरियाणातील भवानी या जिल्हात होणाऱ्या स्पर्धेत वर्चस्व निर्माण करत आपले कुस्तीतील कौशल्य प्रस्थापित करून अहमदनगरचे नाव रोशन करण्याच्या विचाराने प्रेक्षकांची मने जिंकली .

पै.पानसरे वेदांत छगनराव ९७ किलो वजनी गटात खेळत आहे.

या कुस्ती वजन गटामध्ये प्रथम क्रमांक मिळून अखिल भारतीय कुस्ती क्रिडा स्पर्धा साठी चौधरी बन्सीलाल  युनिव्हर्सिटी भिवानी हरियाणा येथे या स्पर्धा चालू आहेत. कुस्ती कोच म्हणून प्राध्यापक पारखे सर मिरजगावकर व प्राध्यापक रावसाहेब सिद सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले असून ते डी वाय पाटील विद्यालयाकडून सलग नऊ वेळा उत्तम कुस्ती कोच व संघ व्यवस्थापक म्हणून काम केलेले आहे अखिल भारतीय अंतर विद्यापीठ कुस्ती कोच म्हणून त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे त्यांचे वेदांत पानसरे ला उत्कृष्ट असे मार्गदर्शन लाभले .खेळाडूंसोबत ते ही हरियाणाला उपस्थित आहेत. 

या कुस्तीपटूंना उत्तर महाराष्ट्र केसरी युवराज भोसले, उपमहाराष्ट्र केसरी अनिल गुंजाळ , महाराष्ट्र केसरी गुलाब बर्डे ,राष्ट्रीय खेळाडू अमित गाडे,कुस्ती संघटक मा.सोमनाथ चव्हाण,क्रीडालक्ष महाराष्ट्र अध्यक्ष  पै.रमेश थोरात सर,क्रीडालक्ष महाराष्ट्र उपाध्यक्ष अमोल आबा मदने,राष्ट्रीय सुवर्णपदक विजेता पै.राहुल वाघमोडे,क्रीडालक्ष अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी पै.छगन पानसरे सर तसेच सायकल पोलो कोच सी एम पाटील यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या