निदान निदान

 

निदान निदान

    प्रत्येक गावात तालुक्यात जिल्ह्याच्या ठिकाणी गोरगरीब जनतेला सर्वसामान्य माणसाला सवलतीच्या दरात अथवा मोफत वैद्यकीय सेवा सुविधा मिळाव्यात. लोकांची बोगस डॉक्टर यांचेकडून कारण नसताना आर्थिक मानसिक लुट होऊ नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र. उप जिल्हा रुग्णालय अशी वैद्यकीय सेवा सुविधा पुरविणारी केंद्रे शासनाने उभी केली आहेत. या आरोग्य केंद्रात सर्व आजारांवर नामांकित डॉ यांची नियुक्ती केली गेली आहे. या केंद्रात सर्व उपचार मोफत व औषध सुध्दा मोफत देणे शासनाच्या अधिपत्याखाली आहे. एक्सरे. विविध साथीचे आजार. बिपि. रक्त लघवी. साखर. हृदयविकार मधुमेह रक्तदाब. हाडांचे आजार. फिजिओथेरपी. डिलिव्हरी. सिझर डिलिव्हरी. अपेंडसी. अशया विविध आजारांवर उपचार करण्यासाठी त्या त्या विभागातील नामांकित डॉ नेमण्यात आले आहेत. पण या सर्वांना आठवड्याचा एक दिवस ठरवून दिला आहे. त्याच दिवशी तो डॉ भेटेल. मग मला सांगा जर महिन्यातील चार वार जर तो उप जिल्हा रुग्णालय मध्ये काम करत असेल तर त्याला महिन्यांचा पगार द्यायचा कां शासनाला कसं परवडत. सर्वसामान्य जनता गोरगरीब लोक यांची लुट करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व उप जिल्हा रुग्णालय हेच सर्वात मोठे डॉक्टर लोकांचे केंद्र आहे. म्हणजे कोणत्याही आजाराने पिडीत व्यक्ती हा सरकारी दवाखान्यात उपचार घेण्यास जातो. आणि ज्या सरकारी दवाखान्यातील डॉ कडे जातो त्याची बाहेर ओपीडी असतेच मग पेशंटचया मनात अस काही भरवरल जात की. हा सरकारी दवाखाना आहे येथे ही सेवा सुविधा नाही. आपण आमच्या ओपीडी मध्ये या आम्ही आपणांस लवकरात लवकर बरं करु. म्हणून अश्या डॉ यांना पेशंट शोधायला बाहेर जाण्याची काहीच गरज पडत नाही. आणि मग एक ठराविक रक्कम उपचारासाठी ठरवली जाते आणि उपचार सुरू होतो. मात्र पेशंटला काहीच फरक पडत नाही. मग डॉ सांगतात अजून एक उपचार पध्दती घ्यावी लागेल. आणि मग खुटयाला बांधला या प्रमाणेच हे सर्व पेशंट दर महिन्याचे पेशंट होतात आणि मनमानी आर्थिक लुट सुरू होते

                  प्राथमिक आरोग्य केंद्र व उप जिल्हा रुग्णालय यामध्ये आपले डाॅ म्हणून कर्तव्य बजावणारे जे कोणी डॉ असतील त्यांची जर बाहेर ओपीडी असेलतर यांना सरकारी दवाखान्यात नोकरी देऊ नये अथवा नोकरी वरून कमी करण्यात यावे कारणं हेच आज शासनाच्या आरोग्य प्रत्येकाच्या घरोघरी याला खरोखरच अडचण झाले आहेत 

             सर्वात महत्वाचा आणि आपणांस बरेच काही सांगून जाणारा शब्द आहे तो निदान वैद्यकीय क्षेत्रात महत्वाचा आणि रुग्णाला जीवनदान देण्यासाठी निदान असणे आणि होणे गरजेचे आहे. 

       रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा. हे फक्त लिहिलं जात मोठया बोर्डावर. पण खरोखरच अमलात आणलं जात का. आज रुग्ण सेवा हीच पैसा मिळविण्याचे साधन करण्यात आले आहे. सर्वत्र बोगस डिग्री घेऊन डॉ व्यवसाय करणारे यांना उत आले आहे. ज्याला ताप थंडी. हिवताप मलेरिया काविळ डेंग्यू यांचं ज्ञान नाही असे डॉ आज हाडांचे व विविध विकारांवर उपचार करणारे असा फलक लावत आहेत. ज्यांना आजाराबद्दल कोणताही ज्ञान नाही असे डॉ यांना डिग्री व लाईन्स कोण देत आणि त्यासाठी किती लाच डॉ देतात आणि खुलेआम लोकांना आर्थिक व मानसिक लुट करतात 

              दवाखान्यात रुग्ण हक्काची सनद नाही. रुग्णाला उपचार पद्धती निवडण्याचा अधिकार नाही. मेडिकल निवडण्याचा अधिकार नाही. औषधांच्या दराबाबत चौकशी करण्याचा अधिकार नाही. कोणत्या उपचारासाठी किती खर्च येतो याचे दरपत्रक नाही. पेशंट व नातेवाईक यांना व्यवस्थित वागणूक नाही. दवाखाना स्वच्छ आहे का. अशा विविध रुग्ण हक्कासाठी शासनाने रुग्ण हक्काची सनद तयार केली आहे पण ती आज केराच्या टोपलीत दिसत आहे म्हणजे आपण सर्वजण मूर्ख आहोत कारणं आपण चौकशी करत नाही. औषध पाकिटावर मिळतात आणि मेडिकल वाले डॉ यांना हाताला धरून तुम्ही खा आणि आम्हाला खाऊ द्या असा फंडा वापरला जातो. डॉ ज्या मेडिकल मधील पावती देतो आणि रुग्ण ज्या दवाखान्यात उपचार घेतला त्या डॉ चे औषध त्याच मेडिकल मध्ये मिळते मग काय मनमानी दराने विक्री केली जाते. म्हणजे डॉ आणि मेडिकल वाले गोरगरीब लोक सर्वसामान्य जनता यांच्या भावनेचा बाजार करत आहेत. याला कारणीभूत आहे ते म्हणजे डॉ यांचे निदान ज्ञान जोपर्यंत डॉ यांचा आर्थिक कोटा पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या रुग्णाच्या आजारांचे निदान सापडतं नाही आणि निदान सापडलं तर यासाठी बाहेरच्या यांच्याच पटातलया डॉ मेडिकल लॅबोरेटरी विविध तपासण्या यासाठी चिठ्ठी दिली जाते आणि मग तेथून खरोखरच रुग्णांची मोठ्याप्रमाणात लुट होते

            दवाखान्यात दाखल झाल्याबरोबर डॉ नर्स आपणांस त्यांच्याच संपर्कातील लॅबमध्ये विविध टेस्ट करण्याची चिठ्ठी देतात रक्त लघवी. साखर. बिपी. मधुमेह. फिजिओथेरपी. अशा विविध टेस्ट करण्यासाठी मोठीचया मोठी लिस्ट दिली जाते. आणि मग खरोखरच त्या डॉ ला रुग्णांच्या आजारांचे निदान झाले असा आव आणून उपचार केले जातात. महिने सहा महिने वर्ष. असा उपचार सुरू होतो. आठवडा पंधरवडा. हजारों रुपयांचे औषध घेणे बंधनकारक करण्यात येते. आणि एखाद्या रुग्णाला नाही तर बरेच असे काही रुग्ण आहेत की त्यांना त्या डॉ चे औषधापासून कोणताही फरक नाही अस ध्यानात आले आणि त्यांनी उपचारासाठी दवाखाना बदलला तर सर्वात वाईट प्रकार आमच्या ध्यानात आला आहे की त्याचं रुग्णाने केलेल्या विविध टेस्ट. विविध तपासण्या. सिटीस्कॅन. एक्सरे. असे कोणतेही रिपोर्ट या नविन डाॅकटरला पसंत नसतात मग आम्हाला या सर्व टेस्ट पुन्हा कराव्या लागतील त्याशिवाय आम्हाला उपचार करता येणार नाहीत असं खडखडीत रुग्णाला व नातेवाईक यांना बजाविले जाते. मला एक कळत नाही मानवी शरीरातील होणारें बदल किती दिवसांत होतील. किती दिवसांत रक्त लघवी साखर बिपी मधुमेह रक्तदाब हृदयविकार याची स्थिती बदलते कां. डॉ फक्त आणि फक्त पैसा मिळविण्यासाठी रुग्णाला या सर्व टेस्ट परत करण्याचा सल्ला देतात का. आपण कधी डॉ यांना विचारलें नाही. डॉ म्हणतोय म्हणून आणि आपला पेशंट बरा व्हावा यासाठी आपण पाण्यासारखा पैसा खर्च करत असतो. म्हणजे डॉ यांना सापेक्ष निदान न मिळाल्याने आपला वेळ आणि पैसा वाया जातो वेळप्रसंगी आपला रुग्ण सुध्दा या मूर्ख डॉ यांच्या बेधुंद पणामुळे दगावतो मग सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल केला तर बिघडले कुठे. टेस्ट तपासण्या त्याच मग डबल कशासाठी 

प्रबुद्ध समाजाचे अध्यक्ष डॉ.

  श्रीप्रकाश बर्नवाल म्हणतात की, कोणत्याही समस्येच्या बाह्य लक्षणांपासून सुरुवात करून, त्याचे मूळ कारण जाणून घेणे यालाच निदान म्हणतात . निदानाची पद्धत 'एलिमिनेशन'वर आधारित आहे. निदान हा शब्द सर्व क्षेत्रांमध्ये वापरल जातो 

निदानाची एक महत्त्वाची पद्धत: रेडियोग्राफी

निदानाला खूप महत्त्व आहे. जोपर्यंत रोगाचे योग्य निदान होत नाही तोपर्यंत योग्य दिशेने उपचार अशक्य आहे. त्यामुळे जुन्या ग्रंथांमध्ये रोगनिदान प्रकरण खूप विस्तृत आणि उपचार प्रकरण मर्यादित होते. याचे कारण असे की जर निदान अचूक असेल तर उपचार अचूक असणे आवश्यक आहे.

अनेक रोग स्वतःच बरे होतात आणि निसर्गाच्या प्रतिबंधात्मक शक्तीला कोणाच्याही मदतीची गरज नसते हे खरे आहे, पण असे अनेक रोग आहेत ज्यात निसर्ग असमर्थ ठरतो आणि मग औषधाची मदत घ्यावी लागते. योग्य आणि अचूक थेरपीसाठी निदान योग्य असणे आवश्यक आहे. योग्य निदान म्हणजे त्रासदायक लक्षणांचे मूळ कारण आणि त्यातून निर्माण होणाऱ्या पॅथॉलॉजीचे नेमके स्वरूप समजून घेणे.

थेरपी मध्ये निदान सुधारणे

अनादी काळापासून मनुष्य शारीरिक आणि मानसिक आजारांनी त्रस्त आहे. औषध हा वेदनांपासून मुक्त होण्याचा मार्ग आहे. ज्यांना या विषयाचा विशेष अनुभव व अभ्यास झाला आहे, त्यांचा वेगळा वर्ग झाला आहे. प्रारंभी, रोगाचे कारण दैवी क्रोध, भूत किंवा दुष्ट दृष्टी मानले जात असे आणि जादू, चेटूक, जंतरमंतर इ. नंतर आयुर्वेदाचा उदय झाला आणि त्रिदोष तत्त्वाच्या आधारे निदान सुरू झाले . हे तत्त्व पश्चिमेकडे जाऊन 'चतुर्दोष सिद्धांत' बनले. जेव्हा आधुनिक विज्ञान उदयास येऊ लागले तेव्हा अनेक नवीन सिद्धांत उदयास येऊ लागले: यक्ष-दूषित वातावरण, अशुद्धता, विष, विषाणू इ. पण हे सर्व अर्धसत्य हे सर्व कथन करणारे डॉ यांना निदान झालेच नाही

         आजच सर्वांनी आपला पेशंट आणि त्याला असणारा आजार याबाबत बरोबर निदान झाले असेल तरच उपचार सुरू करा. फक्त आणि फक्त डाॅ म्हणतोय म्हणून आपला वेळ आणि पैसा वाया घालवू नका. आणि आपल्या पेशंटचया जीवाशी खेळू नका आज बोगस डॉक्टर यांना सर्वत्र उत आला आहे दवाखाना आहे म्हणून जाऊ नका डॉ यांची डिग्री कोणती आहे तो उपचार करण्याची जबाबदारी घेत असेल तरच अश्या डॉ यांना भेट व उपचार घया. नसेल तर आपल्याला उपचारासाठी आलेला खर्च मिळवून घेण्यासाठी डॉ यांच्यावर पोलिस स्टेशनला तक्रार करा नाहीतर आपली लुट असे चोर करणारच

      समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८८०८२५८५९

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या