चौकशी चौकशी

 

चौकशी चौकशी

          आपल्या सर्वांच्या परिचयाचा असणारा दैनंदिन जीवनात व्यवहारात कायमस्वरूपी वापरला जाणार असा वाक्य प्रयोग आहे सहज आपण बोलून जातो माझ असं झालं माझं तसं झालं माझी कुणी चौकशी सुध्दा केली नाही. सर्व क्षेत्रात शासकीय निमशासकीय सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय आर्थिक या सर्व ठिकाणी आपणांस विचारणा करण्याचा चौकशी करण्याचा अधिकार आहे

          आपली चौकशी होण्याची सुरुवात आपण जन्म घेतल्यापासून होण्यास सुरुवात होते. आपणं जन्म घेतल्यावर आपले सगेसोयरे आई वडील मित्र मंडळ. सहजच चौकशी करतात की आई मुल दोघ व्यवस्थित आहेत का ? ही आपली चौकशी करण्याची पध्दत असतें. नंतर आपणं शाळेत जातो आणि आपणं काय शिकतो कसं शिकतो आपल्याला कोणत्या विषयांत किती गुण मिळाले यांची आपल्या पालकांनी व शिक्षकांनी केलेली चौकशी आपणांस माहीत आहे.  काॅलेज महाविद्यालय विद्यालय उच्च शिक्षण देणारी शिक्षण व्यवस्था यात आपला रिझल्ट आपले भविष्य घडवित असतो. त्यातूनच सर्व तरुण शिक्षण घेण्यास जातात असं नाही काहीजण  फक्त आणि फक्त आपल्या बापाच्या पैशाला काम नाही म्हणून जातात. आणि विविध प्रकारचे गुन्हे करण्यास सुरुवात करतात त्यात प्रामुख्याने काॅलेज निवडणूक. टोळीयुद्ध. गुंडगिरी बेकायदा अवैध धंदे अस प्रकार चालवले जातात. आणि मग भांडणे मारामाऱ्या होताना दिसतात आणि सर्व प्रकरण टोकाला जाते आणि पोलिस केस गुन्हे दाखल झाल्यामुळे भविष्यात नोकरी नाही त्यामुळे लग्नाला कोण मुलगी देत नाही. समाजात हिन वागणूक.  फुकटची बदनामी जाहिरात   आणि यासर्व प्रकरणात पोलिसांनी त्यांच्या पध्दतीने केलेली चौकशी सर्व प्रकार वेगळाच असतो

              २०१९/ २०२१ असा वेळोवेळी आपल्या विविध जिल्ह्यांत आलेला महापूर आपणं सर्वांनी बघितला आहे लोकांचे जगणे कठीण झाले. अन्न धान्य जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा. या महापूराचे वेळी. शेती नुकसान.  घरांची पडझड.  जनावरे मृत्युमुखी.  पूराचे पाण्यात वाहून गेलेली लोक.  शेळ्या मेंढ्या कोंबडी.  जीवनावश्यक वस्तूंचे वाटप. रोगप्रतिकारक औषध फवारणी  अशा विविध परसथितीचा महापूर काळात सर्वे करण्यात आला होता. त्यात खरोखरच नुकसान झालेल्या लोकांना कोणताही लाभ मिळाला नाही आणि ज्यांचा पूराशी कोणताही संबंध नाही अश्या लोकांनी महापूराचे अनुदान. पंचनामे करणारे यांना हाताला धरून तुम्ही खा आणि आम्हाला खाऊ द्या असा फंडा वापरला गेला. यासर्व प्रकरणाचा लोकांच्या मधून तक्रारी आल्या आणि महापूराने ग्रस्त जिल्ह्यातून जिल्हाधिकारी यांनी पूराचे काळात आपल्या कामात कुचराई करणार्या अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करण्याचे आदेश दिले पण आजपर्यंत दोन वर्ष झाली तरी महापूराचे अनुदान मिळालेच नाही. म्हणजे चौकशी नुसतं बुजगावणे आहे हे खरे आहे

              शेतकरी यांना कर्ज माफी व शेतकरी सन्मान योजना व विविध शेती पूरक व्यवसाय. व शेतीसाठी कर्ज योजना अशा विविध योजना चालू केल्या पण कर्ज हे मोठ्यांच शेतकरी यांचे माफ झाले. शेती औजारे खरेदी योजना मोठ्या शेतक-यांनी लाटल्या. आणि अशा विविध शासकीय शेतकरी हिताच्या योजना. यामध्ये सुध्दा बोगस. आणि गरज नसणारी लाखों रुपये कर्जाच्या नावाखाली उचललेले आणि माग भरलं सुध्दा नाही. यांची सुध्दा चौकशी करण्याचे आदेश वेळोवेळी दिले पण कसलीच चौकशी झाली नाही. म्हणजे लाखों रुपये शेतकरी यांच्या हिस्सयाचे चोरांनी लाटले 

          ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका. तहसिलदार महसूल विभाग पुरवठा विभाग. रेकाॅरड रुम. आवक जावक विभाग. विविध पेन्शन विभाग. आपत्ती व्यवस्थापन कार्यालय. घरकूल योजना.  परिवहन महामंडळ.  रस्ते गटर स्मशानभूमी समाजभूमी विकास योजना. पाणी पुरवठा.  अशा विविध ठिकाणी आपला वेळोवेळी संपर्क येत असतो.आपण आपल्या विविध मागण्या साठी. विविध दाखले मागणीसाठी. अश्या विविध कामांसाठी प्रश्नांसाठी पत्रव्यवहार करत असतो. आणि वेळेत कोणतेही पत्रव्यवहार वेळेत पूर्ण न झाल्यास आपणं चौकशी करतो त्यावेळी आपल्याला उडवाउडवीची उत्तरे दिली जातात बघतो करतो साहेब रजेवर आहे आॅफिस ला स्टाफ कमी आहे अशी एक नाही अनेक उत्तरे दिली जातात

              रेशन घोटाळा सर्वात मोठा घोटाळा आहे सर्व नेते पुढारी आमदार खासदार मंत्री पुरवठा अधिकारी व कर्मचारी हे सुद्धा यामध्ये आपली भाकरी भाजून घेताना दिसत आहेत.  पुरवठा नागरी सनद व नागरिकांची सनद प्रमाणे प्रत्येक कामासाठी प्रत्येक अर्ज निवेदन तक्रार अर्ज व असे अन्य अर्ज निकालात काढण्यासाठी एक विहित कालावधी ठरवून दिला आहे. त्यानुसार नविन रेशन कार्ड काढणे. नाव कमी करणे. नाव वाढविणे. अन्न धान्य मिळण्यासाठी केलेला पत्रव्यवहार. अशा विविध प्रकरणांची विहित कालावधीत चौकशी करणे आवश्यक आहे. रेशन दुकानदार धान्य कमी देतो.  नाव दिसत नाही.  थम उठत नाही. रेशन अन्न धान्य कमी देणे. दुकान उघडण्याची वेळ.  आठवड्यातून किमान किती दिवस दुकान चालु पाहिजे.  तक्रार पुस्तक आहे का. अपंगाला सर्वात प्रथम रेशन अन्न धान्य दिल जात कां. रेशन दुकानात वितरण करण्यात आलेले अन्न धान्य खाण्यास योग्य आहे का.  निवडक व स्वच्छ अन्न धान्य वितरण करण्यात येते का.  शहरांत रेशन दुकान किती.  त्यांचे परवाने नंबर आलेले धान्य. शिल्लक व वितरण कोटा रेशन दुकान चे बोर्डवर मोठ्या अक्षरात लिहला आहे का.  एका रेशन दुकानदार यांचें नावावर एकच रेशन दुकान आहे का. या सर्वांची आपण कधीच गांभीर्याने चौकशी केली नाही आणि आपल्याला गरज नाही. म्हणजे हे पुरवठा विभाग अधिकारी व कर्मचारी रेशन दुकानदार यांना हाताला धरून रेशन घोटाळा करणारच आणि गोरगरीब जनतेचा हक्काचा घास हिरावून घेणार. 

   ‌‌.          वैद्यकीय सेवा ही ईश्वर सेवा.  कालबाह्य झाल आहे आज फक्त आणि फक्त पैसा मिळविण्यासाठी या वैद्यकीय पेशाचा या पांढ-या बुध्दी जीवी लोकांनी अक्षरशः धंदा मांडला आहे आपणांस ठराविक मुद्द्यांची चौकशी करण्याचा अधिकार आहे का. जसं. दवाखान्यात रुग्ण हक्काची सनद लावली आहे का.  उपचार पद्धती निवडण्याचा रुग्णाला अधिकार आहे का.  औषधांचा बेमाफी दर ज्यांचा दवाखाना त्यांचेच मेडिकल असा कोठे नियम आहे का.  रुग्णाची प्रकृती सुधारत नसेल तर दवाखाना व उपचार पद्धती बदल्यांचा अधिकार आहे का.  रुग्णाला कोणत्या आजारासाठी किती खर्च येणार यांचे दरपत्रक दवाखान्यात लावलें आहे का.  रुग्णाला व्यवस्थित व सन्मानपूर्वक वागणूक दिली जाते का.  रुग्णवाहिका सेवा रुग्णांच्या नातेवाइकांकडून बेमाफी बील वसुली करतात का.  आणि ती रुग्ण वाहिका त्याच दवाखान्याची आहे का.  १०८ रुग्णवाहिका वेळेत येते का. जिल्ह्यातील कोणता दवाखान्यात विविध आरोग्य दायी योजनेतून मोफत उपचार होतात.  असे दवाखाने आपल्या जिल्ह्यात किती. आहेत ते गोरगरीब जनता सर्वसामान्य लोक यांना योजनेतून मोफत वैद्यकीय उपचार देतात का.    अशा एक नाही विविध प्रश्नांची आपणं कधीच गांभीर्याने चौकशी करत नाही आणि आपल्याला त्याची गरज नाही. 

                  बांधकाम कामगार सर्वात मोठा जटिल प्रश्न आहे आज सर्वांना विचार करायलाच लावणारा आहे. कारण गोरगरीब लोक संघटित आणि असंघटित क्षेत्रात मिळेल ते काम मिळेल ती मजूरी घेऊन आपले आणि आपल्या कुटुंबांचे पालनपोषण करत असतात. अठठराविशव दारिद्र्य अडाणी व्यसनी गरजू. असा छाप पडलेला घटक म्हणजे बांधकाम कामगार. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून बांधकाम कामगार त्यांच्यासाठी. मुलांसाठी महिला कामगार यांचेसाठी शैक्षणिक वैद्यकीय सामाजिक सुरक्षेसाठी विमा अश्या कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. यासाठी बांधकाम कामगार आहे हे सिद्ध करण्यासाठी इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार यांना नोंदणी अधिकारी म्हणून परवानगी दिली आहे. पण आज या सर्वांनी बांधकाम कामगार नोंदणी याचा बाजार मांडला आहे आज १०००/२००० घेऊन बांधकाम कामगार नोंदणी साठी लागणारे दाखले देणारे इंजिनिअर आहेत आणि यांना पैसै देऊन दाखला घेणारा बांधकाम कामगार नाही. आज सर्वच जिल्ह्यांत बोगस कामगार नोंदणी जोरात सुरू आहे. यासाठी जबाबदार आहेत ते म्हणजे फक्त आणि फक्त इंजिनिअर.  आपल्याला बांधकाम कामगार यांचा कळवळा आहे असा आव आणणारे सहाय्यक कामगार आयुक्त यांनी परवा बातमी दिली की बांधकाम कामगार यांनी योजनांचा लाभ घ्या.  बांधकाम कामगार यांच्यासाठी दिला जाणारा सुरक्षा संच मोफत दिला जातो.  आमच्या सहहयक कामगार आयुक्त भवन कडून बांधकाम कामगार नोंदणी साठी कोणतेही एजंट नेमण्यात आले नाहीत. मग कामगार सोडून सहहयक कामगार आयुक्त भवन मध्ये ठिय्या मारुन बसणारे यांना परवानगी कुणी दिली. सहहयक कामगार आयुक्त यांनी टिव्ही वर. वृतमानपत्रात प्रसिद्ध केले की बोगस कामगार नोंदणी साठी जबाबदार असणारे यांची चौकशी होणारं तर फक्त बोलून दाखवणे पेक्षा आगोदर सहहयक कामगार आयुक्त भवन मध्ये असणारे अधिकारी व कर्मचारी आणि इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार यांची पहिल्यांदा चौकशी आदेश देऊ नका आपल्याला खरोखरच बांधकाम कामगार यांचें भले करायचे असेल तर कारवाई करण्याचे आदेश द्या. सहहयक कामगार आयुक्त भवन मध्ये अधिकारी व कर्मचारी कमी असतील तर एखाद्या युनियनला जबाबदारी द्या. नुसतं बोलू नका चौकशी करण्याचे आदेश द्या. बांधकाम कामगार यांचे अपघातांचे आज जिल्ह्यात प्रमाण वाढले आहे. अपघात झाल्यावर जिल्ह्यातील संघटना सेवाभावी संस्था युनियन सामाजिक संघटना राजकीय पक्ष संघटना. हे त्या मयत कामगारांच्या घरच्यांना भेट देतात आम्ही मदत करु असे आश्वासन देतात आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे फोटो काढायला विसरत नाहीत. आणि मग युटुब ट्विटरवर मोबाईल वर  आपली जाहिरात करायला सुरुवात करतात.  सहहयक कामगार आयुक्त भवन मध्ये वार्षिक एक निधी जारी केला जातो तो बांधकाम कामगार योजनांची माहिती. मेळावे. सुटसुटीत सापेक्ष कामगार नोंदणी. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांचेकडून निधी येतो तो काय केला जातो माझ्या बघण्यात कुठेही सहहयक कामगार आयुक्त भवन कडून आजपर्यंत कोठेही मेळावा. नोंदणी कॅम्प. झालेला नाही मग एकादा बांधकाम कामगार मयत झाल्यावर त्याच्या घरच्या लोकांना भेट देऊन फोटो काढण्यापेक्षा कामगारांना नोंदणी करण्यासाठी भेट घेतांना फोटो काढा त्याला बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी तयार करा. बांधकाम व्यावसायिक. मालक. इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार हे बांधकाम कामगार यांना गरजेनुसार सुरक्षा साधनें देतात का.  दिलेली सुरक्षा साधनें बांधकाम कामगार वापरतात कां सुरक्षे संबंधित बांधकाम कामगार यांच्यात जागृती करणे गरजेचे आहे. मयत झाल्यावर चौकशी करू नका जीवंत असेल तेव्हाच त्याने नोंदणी विमा केला आहे का याची चौकशी करा. जिल्ह्यातील विविध कामगार नेते कामगार हितचिंतक आणि नेते पुढारी आमदार खासदार मंत्री यांचें बगलबच्चे यांनी अपघाती कामगारांचे कुटुंबाला मोकळ भेटू नका प्रत्येक संघटना व सेवाभावी संस्था युनियन सामाजिक राजकीय संघटना यांनी जर आज आपली एका दिवसांची वरकमाई बाजूला काढली तर लाखो रुपये गोळा होतील ज्याच्या जीवांवर मिळविले त्यातलेच थोडं मयत कामगार याच्या कुटुंबाला द्या शासनाची मदत केव्हा यायची तेव्हा येऊ द्या. मोकळी चौकशी नको काम दाखवा. 

          आज सर्वच क्षेत्रात चौकशी करण्याची गरज आहे पण आपण कधी करणारं मला माहित नाही. आज बाजारात येणारी फळे फुले भाजीपाला.  यावर वापरली जाणारी आणि मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम करणारे केमिकल यामुळे विविध रोग आजार.   विविध खाद्यपदार्थ विक्री करणारे दुकानें.   खाद्यपदार्थ विक्री करणारे त्यात वापरला जाणारा कच्चा निकृष्ट दर्जाचा कच्च्या तेलाच्या कच्चा  माल यामुळे आज लोकांना ह्रदय रोग. बी पी. डायबिटीस. कॅन्सर असे विविध रोग होण्याचा धोकाही संभवतो.  दैनंदिन आहारामध्ये जीवनात वापरल्या जाणारया वस्तू. कोलगेट. वाशिंगपाउडर. शॅंपू. साबुदाणा साबन. चहा साखर. यावर किंमत एक आणि विक्री करण्याचा दर एक. मार्केट मध्ये विकले जाणारे निकृष्ट दर्जाचे मांस मासे चिकन मटण यांच्या दर्जाची आपण कधी चौकशी केली आहे का. इलेक्ट्रॉनिक वस्तू. कपडे. आॅनलाइन पध्दतीने खरेदी यामुळे होणारी लूट व फसवणूक याची सुध्दा आपणं कधी चौकशी करत नाही. 

     आजचं चौकशी करणयाचा ध्यास घ्या

समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या