बाजार बाजार

 


                  वरील शब्द आपणास माहीत आहे कारण जीवनात आपण कीतीतरी प्रकारचें बाजार बघितले आहेत. आपला चांगला वाईट असणारा जीवनावश्यक माल नुसता तोंडाचे भांडवल करून ग्राहकांच्या गळ्यात घातला जातो याचा अर्थ असा होतो की आपला माल वस्तू योग्य भावात विकून चांगला मोबदला मिळवणे यासाठी उभे केलेला एक व्यक्ती समूह म्हणजे बाजार म्हणता येईल

           खेडेगावात लोकवस्ती कमी असल्यामुळे तेथे पाराखाली भरलेला बाजार आपण बघितला असेल. लोकसंख्या वाढत गेली आणि त्यानुसार बाजाराची व्याप्ती सुध्दा वाढली लोक आपल्या दैनंदिन जीवनात लागणारे साहित्य वस्तू खरेदी करण्यासाठी शहराकडे लोकांचा लोंढा वाढला मग विक्रेते आणि ग्राहक यांचें संबंध दृढ झाले जाहिराती वाढल्या बोगस माल म्हणील तेवढ्या किमतीला विकला जाऊ लागला. शहरात दलाल एजंट मार्केट यार्ड मध्ये शेतक-यांच्या मालावर मोठ्या प्रमाणात नफा मिळवयला लागले नगरपरिषद महानगरपालिका या क्षेत्रात या संस्थांकडून निवडलेले अधिकार कर्मचारी शेतकरी माल विकायला आला की त्याला जागा द्यायची नाही बसायला बाजारकर नावांवर पैश्याची मागणी करायला लागले व्यापारी एखाद्या गरिबाला आपला माल विकायसाठी जागा देत नाहीत. अधिकार व कर्मचारी यांचे आणि स्थानिक व्यापारी यांचें संगनमत करुन शेतकरी व इतर लोकांना नाहक त्रास देत असतात. 

          वस्तूंचाच भरत नाही त्यातच. म्हैस. बैल शेळ्या मेंढ्या कोंबडी उंट घोडे गाढव माकड कुत्री अशा विविध जनावरांचे बाजार सुध्दा आपण बघितले आहेत पण यांत सुध्दा ‌दलाल एजंट यांचेच राज्य बाजारावर असल्याचे आपणं बघतो मग काय बाजार यांच्या बापाचा आहे काय ? शेतकरी व गोरगरीब लोकांना या सुध्दा बाजारात जागा नाही का ? 

         शासकीय बाजार वैयक्तिक लाभाच्या योजना. सामुहिक लाभाच्या योजना. रेशन कार्ड. जेष्ठ नागरिक योजना. महसुली योजना. कामगार योजना. मजूर व शेतकरी. विद्यार्थी व युवक योजना. महिलांसाठी योजना. आदिवासी योजना. पर्यावरण. दलित मुक्ती. विज्ञान. आरोग्य. नागरि स्वातंत्र्य. शेतमजूर प्रश्न. सामाजिक व राजकीय. आर्थिक. वैद्यकीय शिक्षण. मताधिकार. मूलभूत हक्क. धर्मभेद. प्रांतभेद. भाषाभेद वंश. भाषा. लिंग. समतेचा हक्क. स्वातंत्र्याचा हक्क. शोषण विरोधी कायदा. धार्मिक स्वातंत्र्याचा कायदा. शैक्षणिक व सांस्कृतिक हकक. सवैधानिक उपाययोजनांचा हक्क. ग्राहक संरक्षण कायदा. व्यसनमुक्ती. लघुउद्योग. अनाथ व अपंग पुनर्वसन. अंधश्रद्धा निर्मूलन. बांधली मजूरांचे सथालांतर. लोककला. बालकल्याण. कायदा आणि न्याय. पाणीपुरवठा व पाणीवाटप. ग्रामपंचायत. नगरपरिषद. महानगरपालिका. जिल्हा परिषद. पंचायत समिती. जिल्हाधिकारी कार्यालय. विज कार्यालय. खाजगी नेते पुढारी. जंगलसंपतती. खनिज संपत्ती. धरणे. कालवे. बोगदे. बंद. आंदोलन. मोर्चे. उपोषण. टाळेबंदी. संचारबंदी. चळवळ. उठाव. विविध करोडो रुपयांचे घोटाळे. विमा कंपन्या. बेरोजगारी. भ्रष्टाचार. सार्वजनिक उत्सव. सार्वजनिक सामाजिक कार्यक्रम. गुंडगिरी. दहशतवाद नक्षलवाद. फुटीरता. संपर्क माध्यम. जाहिरात. जातीयवाद. लोकसंख्या नियंत्रण. अशा विविध ठिकाणी आपण रोजच जातो आपणास काय वागणूक मिळते आणि आपणास न्याय मिळतच नाही कारणं आधुनिक युगाच्या गतिशिलतेने संपूर्ण भान असलेली व त्यांच्याशी सहजपणे एकरुप होणारी व्यक्ती संकुचित निषठाचा त्याग करून आधुनिकतेशी सुसंगत अशा व्यापक निषटाचा स्वीकार पुरस्कार व प्रचार करणारी धर्म श्रधदाची व बुद्धी निष्ठा व व्यापक माणवी हिताच्या कसोटीवर परखड व्यक्ति आपल्यापुढे अजून कोणी आलें नाहीं. चंगळवाद आणि भोगवादावर प्रखर हल्ला करणारी औधोगिक संस्कृती व तंत्रज्ञानाचे लोकविरोधी विनाशक अ कल्याणकारी म्हणून अमंगल करणारे आज आपल्यावर राज्य करत आहेत   

                बाजार वरिल शासकीय. निममशासकीय. विविध आॅफिस मध्ये मोठा बाजार चालतो. सर्वसामान्य जनता गोरगरीब व्यक्तिला न्याय कधी मिळालाच नाही. उलट. काही मिळतय का यासाठी गोरगरिबांना हेलपाटे मारून आपल्या चप्पला झिजवावया लागतात. म्हणजे सर्वात मोठा बाजार येथे चालतो कधी बंद होणार माहिती नाही ? कोण बंद करणार माहिती नाही ? न्याय हकक व अधिकार मिळणारं का ? या बाजारात ? कोण आपणास कशाची मागणी करत असेल तर त्याला विचारा शासन तुला पगार देत नाही का ? 

               बाजाराचे शेवटचे उदा देतो. महिला व लहान मुले यांचा सुध्दा मोठा बाजार समाजातील नामांकित व्यक्ती करतात. मुलांना परदेशात विकले जाते. महिलांची विक्री केली जाते. चांगली गोंडस मुल यांना हात पाय डोळे निकामी करून सिग्नल वर भिक मागण्यासाठी तयार केले जाते किती भयानक प्रकार आहे अंगावर काटा उभा राहतो. नोकरी आमिष दाखवून महिला. युवक युवती यांना फसवणूक बोलावलं जातं आणि त्यांच्या अंगांचा खुला बाजार आज चालू आहे आपल्याला हे कळणार कधी ? 

              वैद्यकीय बाजार वैद्यकीय सेवा ईश्वरी सेवा होती पण कधी गतकाळात होती आपला परमधरम म्हणून काम करणारे वैध हकीम मोठे मोठे आजार आपल्या वैद्यकीय शिक्षण व झाडापासून तयार औषधाने करत होते. उपचार घरातच केलें जात होतें. घरांचे रुपांतर छोट्या छोट्या दवाखान्यात झाले वैध यांना नविन नाव मिळाले डॉ. दर्जा वाढला. उपचार करण्याच्या नावाखाली पैसा जमावयला सुरुवात झाली. नंतर छोट्या दवाखान्याचे रुपांतर हाॅसपिटल मग काय यांचाच दवाखाना विदेशी औषध उपचार यांचाच मनाला येईल तेवढी फि. उपचार घेणा-या रुग्णाला औषध सुध्दा यांच्याच मेडिकल मधून घेणे बंधनकारक करण्यात आले म्हणजे गोरगरीब जनता सर्वसामान्य माणूस याला लुटण्याचा पुरेपूर सापळा लावला जातो. रुग्ण हक्क सनद कोणत्याही दवाखान्यात नाही. उपचारासाठी कोणतेही दर नाहीत शासनाचा अंकुश नाही वयोवृद्ध व्यक्ती. महिला. लहान मुले. यांना सुध्दा या नराधमांनी सोडलेले नाही. जीवंत व्यक्तिला यांनी सोडले नाही तर मयत व्यक्तिचे प्रेत सुध्दा पैशासाठी अडवून ठेवले जाते. आपल्याला उपचार पद्धती निवडण्याचा अधिकार आहे. दवाखाना निवडण्याचा अधिकार. मेडिकल निवडण्याचा अधिकार. उपचारात सुधारणा होत नसेल तर दुसर्या दवाखान्यात उपचार घेण्याचा सुध्दा अधिकार आहे. औषधांची किंमत. उपचारांचे दराची विचारपूस करणयाचा अधिकार आहे. विविध योजनांतून मोफत उपचार घेण्याचा अधिकार. महिलांच्या साठी विशेष उपचार पद्धती निवडण्याचा अधिकार. लहान मुले यांना विशेष उपचार पद्धती निवडण्याचा अधिकार. परवा कोरोना सारखे संकट अजून आहे पण आपणांस डॉ लोकानी आपणांस काय वागणूक दिली आपण बघितली आहे. तपासणी नाही. अंगावर औषधं टाकणे. हाडांच्या रुग्णांसाठी ताप थंडी याच औषध तेही हजारांच्या घरात. लांबून विचारपूस करणे.  

         डॉ ला देव माणले जाते पण आत्ता यांचें रुप काय आहे 

विचार करा बाजार बंद झाला पाहिजे असे एक नाही अनेक बाजार चालू आहेत आपल्या आजूबाजूला चालणारा बाजार बंद झालाच पाहिजे 

       समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रूग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या