शेवगाव प्रतिनिधी
अक्षय केदार
पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर हे गाव या गावामध्ये अजिनाथ दहिफळे नावाचा तरुण गेली पाच वर्षांपासून आपल्या गावातील समाज्याची जान आसनार्या थोर व्यक्तिच्या मदतीने पाथर्डी शेवगाव तालुक्यातील अनाथ व निराधार मुलांना शिक्षणासाठी अधार देत आहे...त्यांना दत्तक घेत आहे...
आत्तापर्यंत जवळपास पाथर्डी शेवगाव तालुक्यातील तीस मुलांना त्याने प्राथमिक शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे...व कित्येक निराधार मुलांना शालेय साहित्याची मदत करुन त्यांना शिक्षणासाठी अधार दिला आहे..
खरच त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे ..काल आव्हाने येथील दोन अनाथ निराधार मुलांना त्यांनी पुर्ण शालेय साहित्य भेट दिले तीन वर्षांपासून ते या अनाथ व निराधार मुलांना न विसरता शालेय साहित्य आणुन देतात खरच त्यांचे कार्य कौतुकास्पद आसल्याचे शाळेचे मुख्याध्यापक गरड सर बोलताना म्हणाले..
फक्त अनाथ निराधार मुलांना शिक्षणासाठी मदतच नाही तर आपल्या गावातील होतकरू व हुशार पन्नास हुन अधिक मुलांचे गेली चार वर्षापासून रोज आपली सर्व कामे सोडुन चार-पाच तास मोफत क्लास घेत आहेत...गावातील आठ दहा लहान मुले तर अक्षरशा रात्री झोपण्यासाठी सुद्धा त्यांच्या घरी असतात. नक्कीच गावातील मुलांना आधिकारी बनविण्याचे स्वप्न त्यानी मनाशी ठरविले आहे..हे कार्य करण्यासाठी वेळोवेळी गावातील सर्वांचे सहकार्य व मार्गदर्शन मिळते म्हणूनच हे कार्य मला शक्य आहे ते म्हणाले.व लवकरच आपन आपल्या गावामधे अनाथ व निराधार मुलांसाठी अनाथालयाची सुरवात करनार आहोत आसे ते म्हणाले..
कायदा माझ्या भारतीय घटनेचा - ..
No comments:
Post a Comment