नवनाथ खेडकर यांना समाज रत्न पुरस्कार जाहीर....!

https://shooterconsultationcart.com/azp33ctwgz?key=f5e461ccbeb850c3df0b07f34593b0c2

 नवनाथ खेडकर यांना समाज रत्न पुरस्कार जाहीर....!

 



शेवगाव प्रतिनिधी 

अक्षय केदार


शेवगाव तालुक्यातील राणेगाव येथील रहिवासी असलेले तसेच डोंगराळ पट्यात राहून देखील सर्व सामान्यांची जाण ठेवणारे गोर गरीब जनतेच्या सुखदु:खात नेहमी सहभागी होऊन सर्व सामान्य जनतेचे हित जोपासणारे सामाजिक कार्यकर्ते नवनाथ खेडकर यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत नुकताच जय भगवान युवा प्रतिष्ठाण दैत्यनांदूर यांचे तर्फे देण्यात येणारा समाज रत्न पुरस्कार नवनाथ खेडकर यांना जाहीर करण्यात आला असून सदर पुरकाराचे वितरण दि. १५ फेब्रुवारी रोजी दैत्यनांदूर येथील भाऊ बाबा मंदिरासमोर होणार आहे. या पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठी ह.भ.प. रामगिरी महाराज येळेश्वर संस्थान येळी तसेच शेवगाव-पाथर्डीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंढे, पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रंजीत डेरे, एसपी ऑफिस मधील संजूबाबा गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत व पंचायत समितीचे सभापती गोकुळ दौंड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमासाठी नवनाथ खेडकर यांना प्रतिष्ठान च्या वतीने त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल समाजरत्न पुरस्कार जाहीर केला आहे वरील मान्यवरांच्या शुभहस्ते नवनाथ खेडकर यांना हा हा पुरस्कार प्रधान करण्यात येणार आहे. खेडकर यांचे गेल्या तीन-चार वर्षापासून चालू असलेल्या सामाजिक कार्याची दखल दैत्य नांदूर येथील जय भगवान युवा प्रतिष्ठान घेतली असून जय भगवान प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आजिनाथ दहिफळे यांनी नुकतीच त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे विविध संस्था तसेच मित्रमंडळी व गावातील नागरिकांनी अभिनंदन केले आहे.

वाचा-

खाद्य तेलावर अन्न प्रशासन ची धाड- FDA MUMBAI


No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या