बेलापूर गावात एम आय एम ची एन्ट्री
बेलापूर गावात एम आय एम कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली होती. बैठकीचा मुख्य मुद्दा बेलापूर गावाची जबाबदारी कोणाला द्यायचे. या अनुषंगाने श्रीरामपुर तालुका अध्यक्ष शकील शेख व त्यांचे सहकारी बेलापूर गावात आले होते. श्रीरामपूर तालुका अध्यक्ष शकील शेख यांनी एम आय एम पक्षा संदर्भात माहिती दिली व एम आय एम पक्ष देशात बॅरिस्टर असदुद्दिन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली तर महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील आणि प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफर कादरी यांच्या नेतृत्वाखाली व अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे. श्रीरामपूर तालुक्यात पक्ष बळकट करण्यासाठी माझ्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. एम आय एम पक्ष अता एका प्रदेशा पुरता सीमित नसून पूर्ण देशात कार्यरत आहे. बिहार नंतर हैदराबाद निवडणुकीत पक्षा सोबत जुळण्यास भरपूर लोक इच्छुक आहे.
नवनिर्वाचित बेलापूर अध्यक्ष मोहसीन शेख यांनी सर्वांचे आभार मानणे पक्ष बळकट करण्यासाठी सर्व तो प्रयत्न करील अशी ग्वाही दिली. यावेळी बेलापुर गाव अध्यक्ष मोहसिन खांवाजा शेख , उपाध्यक्ष निसार रफीक शाहा, सचिव शब्बीर मजीद शाहा , कार्यअध्यक्ष इसमाईल सय्यद, सल्लागार मोईन शेख, यांना जबाबदारी देण्यात आली.
कार्यक्रमाला उपस्थित होते तालुका अध्यक्ष शकील भाई शेख, शहर अध्यक्ष यूनुस शेख, शहर उपाध्यक्ष आमोल रूपट्के, शहर संगठक किरण बोधक व सह संगठन शाकीर भाई, हरेगांवचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वाचा -
No comments:
Post a Comment