प्रेषित पैगंबर मोहम्मद सर्वांसाठी पुस्तक प्रदर्शन संपन्न
अहमदनगर- प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित पुस्तक प्रदर्शन धरती चौक अहमदनगर येथे भरविणयात आले होते. याप्रसंगी लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांनी संपूर्ण मानव जातीसाठी जी शिकवण दिली आणि संपूर्ण मानव जातीला अंधारातून उजेडाकडे आणले ते केवळ मुसलमानांचे नसून ते समस्त विश्वाला प्रदान करण्यात आलेले साक्षात करुणा सागर आहेत. त्यांचा संदेश सर्वान पर्यंत पोहोचावे हेच उद्देश या पुस्तक प्रदर्शन मागे होता.व तो हेतु काही प्रमाणात सफल झाला. पुस्तक प्रेमींनी भरपुर पुस्तके खरेदी केली.
याप्रसंगी अनेक पुस्तके भेटही देण्यात आली. अहमदनगरचे ज्येष्ठ नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी पुस्तक प्रदर्शनास शुभेच्छा दिल्या.मराठा सेवा संघाचे महानगर अध्यक्ष अभिजीत वाघ यांनीही भेट दिली.आजच्या काळात या पुस्तकांची फार गरज आहे असे यावेळी उद्देशून सांगितले.
या पुस्तक प्रदर्शनाच्या यशस्वी साठी फिरोज शेख, अलतमश जरीवाला, अयूब खान,मकबूल सर, यूनुस शेख, इमरानबागवान,आदिनी परिश्रम घेतले.
वाचा -
No comments:
Post a Comment