फ्रांस विरोधात पैठण तहसीलदारांना निवेदन

फ्रांस विरोधात पैठण तहसीलदारांना निवेदन


पैठण - पैठण येथे विविध धार्मिक , सामाजिक , तसेच राजकीय संघटना मार्फत फ्रांस मध्ये इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित मुहम्मद ( स . ) यांच्या बद्दल केलेल्या आपत्तीजनक टिप्पणी व तेथील सरकारने केलेल्या त्यांच्या त्याचे समर्थन या विरोधात निषेध दर्शविणारे निवेदन मा . राष्ट्रपती महोदय यांना मा . तहसीलदार साहेब चंद्रकांत शेळके , पैठण यांच्या मार्फत देण्यात आले . दया आणि करुणेचे सागर प्रेषित मुहम्मद ( स . ) यांच्या बद्दल जाणीव पूर्वक आपत्तीजनक साहित्य प्रसिद्ध करून समस्त जगातील मुस्लिमांचे भावना दुखावण्याचे काम फ्रांस सरकार करीत आहे . दोषींवर कार्यवाही करनेसोडून फ्रान्सचे अध्यक्ष त्यांची पाठराखण करीर आहे . हे अत्यंत खेदजनक असून याबाबत फ्रांसच्या अध्यक्षांनी त्वरित समस्त मुस्लीम समाजाची माफी मागावी व सदरील घटनेमागील दोषीवर कार्यवाही करावी तसेच भारत सरकारनेही फ्रांसला याबाबत ताकीद करावी, तसेच फ्रांस सोबतचे सर्व संबंध तोडून भारतातील त्यांची वकिलाती बंद करावी व इतर योग्य कार्यवाही करावी असे निवेदन पैठण येथील जमियत उल्मा ए हिंद , जमात ए इस्लामी हिंद , राहे- लील्लाह फौंडेशन , बहुजन मुक्ती मोर्चा , बामसेफ अश्या विविध संघटना कडून देण्यात आला . यावेळी शहरे काजी - काजी फजलुल्ला , हनीफ कट्यारे , नगरसेवक हसनोद्दिन कठ्यारे , अॅड. शेख इम्रान, अंजार कादरी , काजी कलीमुल्ला , मौ . मुफ्ती रज्जाक , रफीक कादरी , अजीम कठ्यारे , मौ . सिराज , हमीद सर , मोतीलाल घुन्गासे , गव्हाणे सर , नंदकिशोर मगरे , इस्माईल नगरकर , मौ.मन्सूर , मौ.अकबर , मौ . अन्सारी आदी . उपस्थित होते.


वाचा -

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या