** लुटारु अड्डा **
ग्रामीण भागात ग्रामपंचायत ही एक ग्रामीण लोकांसाठी मिनी मंत्रालय म्हणून काम बघते आणि या माध्यमातून ग्रामीण भागासाठी असणार्या विकास योजना राबविण्यात येतात आणि त्यावर ग्रामपंचायत यांचे नियंत्रण असते . शहरातील लोकांसाठी तहसिलदार कार्यालय हे मिनी मंत्रालय असतं सर्व पेन्शन योजना. महसूल विभाग. पुरवठा विभाग . निवडणूक विभाग. असे एक नाही अनेक विभाग तहसिलदार यांचे मार्गदर्शनाखाली काम करत असतात . पण आज उलट झाल आहे. तहसिलदार कार्यालय हे गोरगरीब सर्वसामान्य लोकांना एजंट दलाल यांच्यामार्फत लुटारु अड्डा तयार झाला आहे. लोकांचें हजारों विविध अर्ज धुळखात पडले आहेत . लोकांना फक्त आणि फक्त हेलपाटे मारुन आपला वेळ आणि पैसा वाया घालवावा लागत आहे. कार्यालय वेळ १० ते पाच असताना सुद्धा सकाळी दहा वाजता एकही अधिकारी आपल्या दालनात नसतो. तहसिलदार कार्यालयात बायोमेट्रिक पद्धत कार्यरत नाही . ज्या अपंग व्यक्तींना कार्यालय जाता येत नाही त्याचे शंका निरसन किंवा आॅफिस चे काम असल्यास एकही अधिकारी खाली येऊन यांची भेट घेण्यास यांना वेळ नाही.
तहसिलदार कार्यालयात खालील प्रमाणे कामकाज चालते
विविध कायदे व शासन निर्णयानुसार तहसिलदार यांचेवर मुख्यतः खालील प्रकारची कामे सापवलेली असतात
(१) प्रशासकीय कामकाज
(२) अर्धनयायिक कामकाज
(३) कार्यकारी दंडाधिकारी नात्याचे कामकाज
(४) इतर कामकाज
प्रशासकीय कामकाज
(१) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये खालील अधिकार हे तहसिलदार यांचे मुळ अधिकार आहेत
(अ ) अधिनियमातील उपबंधानुसार मंजूर करण्यात आलेल्या जमिनींचा भोगवटा करणयास आदेश (म ज अ कलम ३०)
(ब. ) इतर व्यक्तिच्या मालकीच्या जमिनीतून पाट बांधने. ( म ज म अ कलम ४९ )
( क. ) जमिन सोडून दिल्यास जमिनीचा स्विकार करणे. ( म ज म अ कलम ५५ )
( ड ) भूमापन क्रमांकाच्या हददीवरून रस्ता देणे (. म ज म अ कलम १४३ )
( इ ) हददिचया निशाणीचे नुकसान केल्याबद्दल शास्ती ( म ज म अ कलम १४५ )
( इ) फेरफाराची नोटीस हितसंबंधी यास आणि संबंधित तलाठी यांना लघुसंदेश सेवा. ( एम एम एस )
किंवा इलेक्ट्रॉनिक मेल
(इ मेल ) किंवा विहित करण्यात येईल अशा इतर कोणत्याही उपक्रमांद्वारे पाठविणे. ( म ज म अ कलम १५० )
( इ ) थकबाकी विषयांची हिशेब प्रामाणित करणे ( म ज म अ कलम १७५ )
( उ ) दुय्यम असणारे अधिकारयाकडून किंवा त्यांच्याकडून प्रकरणे हस्तांतरित करणे ( म ज म अ कलम २२६ )
( ऊ) आदेश अंमलबजावणी स्थगित करणे. (. म ज म अ कलम २५६ )
( ए ) हाताखालील अधिकार्यांचे अभिलेख व कार्यवाही मागविणे व त्याची तपासणी करणे ( म ज म अ कलम २५७ )
( ओ ) आदेशांचे पुनर्विलोकन करणे ( म ज म अ कलम २५८ )
याशिवाय शासन आदेश क्रमांक यु एन एफ १४६७ )( इ ) आर दिनांक च १४/८/१९६७ अन्वये जिल्हा अधिकारी यांचे काही अधिकार खालील अनुसूचित दर्शविलेल्या मर्यादेत तहसिलदार यांना प्रदान करण्यात आले आहेत
उद्याच्या मॅसेज मध्ये पुढील माहिती
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांचेकडून नोंदणीकृत बांधकाम कामगारांना जीवीत व सक्रिय बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व आत्ता जागोजागी आपल्या मागणीनुसार बांधकाम कामगारांना वाटप करण्यासाठी मंडळाकडून प्रत्येकजण संघटना सेवाभावी संस्था युनियन पक्ष सामाजिक संघटना हे आपल्याकडील नोंदणी बांधकाम कामगार यांची यादी देऊन मागणी करु शकतात तरि ईसलापूर शहर व आजूबाजूच्या खेडे गावातील असे काही बांधकाम कामगार असतील कि ज्यांना सुरक्षा संच मिळालेला नाही अशा कामगारांनी आत्ता एकत्र येऊन सुरक्षा संच आपल्या गावात तालुक्यांत न सांगलीला जाता मिळावा अशा मागणीसाठी बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर हे मंडळाकडे पत्र व्यवहार करणार आहेत तरी ज्यांचा सुरक्षा संच मिळणे बाबत अर्ज विना शुल्क भरण्यासाठी खालील नंबरवर संपर्क आजचं करा आणि आपले सुरक्षा संच मागणीसाठी नाव नोंदवा
(१) विहित नमुन्यातील अर्ज आमचे कडे उपलब्ध आहे
(२) नोंदणी पुस्तक पावती झेरॉक्स
(३) आधार कार्ड झेरॉक्स
(४) एक फोटो
कोणतेही शुल्क न घेता आपले सुरक्षा संच मिळणे चे अर्ज भरण्यात येतील बांधकाम कामगार कोणत्याही संघटनेचा सभासद असला तरी त्याची कामगार नोंदणी कोणीही केली असेल तरी तो बांधकाम कामगार असला म्हणजे झाल
आत्ता कामगार ताकद बघायची वेळ आहे तरि आजच्या आज कागदपत्रांच्या पूर्तताकरून फोन करा सगळ्यांच्या मागणी नुसार होत आहे मग आपल्या का नाही
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
९८९०८२५८५९
No comments:
Post a Comment