मी काही बोललो की आग लागते - खा. इम्तियाज जलील

 

मी काही बोललो की आग लागते - खा. इम्तियाज जलील


अहमदनगर - भारत देशात दिवसेंदिवस जातीय तेढ जास्त होत चाल्यामुळे देशात जातीय सलोखा निर्माण करण्याची अत्यंत गरज आहे. या मुद्द्याला समोर ठेऊन अहमदनगर येथील एम आय एम युवा तर्फे सर्जेपुरा भागात "कौमी एकता" चा शिरखुर्मा  कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात सर्व धामाच्या लोकांना निमंत्रण देण्यात आले होते. एम आय एम प्रदेश अध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील है कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती होते. खासदार इम्तियाज जलील यानी आपल्या भाषणात सांगितले की मी आहे जातीय सलोख्याचे कार्यक्रम घेणे खूप महत्त्वाचे आहे मला आनंद आहे की माझ्या बरोबर या कार्यक्रमात हिंदू समाजाचे व क्रिस्तशन समाजाचे धर्म गुरू आहे. माझी परिस्तीत आहे आहे की मी काही बोललो की आग लागते परंतु या कार्यक्रमात मी अजून बोलायल सुरू पण नाही केले तर आज लागली. खा. इंतियाज जलील यांनी आपल्या भाषणात सांगितले की अहमदनगर शहरात गरीब फेरीवाल्यांचा प्रश्न आहे. सरकारची योजना आहे की या गरीब फेरीवाल्यांचा पुनर्वसन करणे. त्यांनी प्रशासनाला सांगितले की आपण लवकरात लवकर या गरीब फेरीवाल्यांचा प्रश्न मार्गी लावावे कारण या फेरीवाले जेव्हा काही विक्ताल तेव्हा त्यांचा घर चालतो. प्रशासन जर कोणाच्या दबावाखाली काम करीत असेल लक्षात ठेवा या गरीब फेरीवाल्यां बरोबर एम आय एम उभी आहे. खा. इम्तियाज जलील यांनी सांगितलें की योग्य वेळ आल्यावर पत्रकारांना पण उत्तर देऊ. या कार्यक्रमाला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष खा. इम्तियाज जलील साहेब, विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष कुणाल खरात, हनुमान मंदिर चे पुजारी कन्हैया लाल परदेसी, फादर वागमारे, पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते धम्मरज साळवे, पुणे जिल्हा अध्यक्ष फय्याज शेख, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, संतोष शिंदे, शहर अध्यक्ष सरफराज जहागीरदार, युवा शहर अध्यक्ष अमीर खान, युवा शहर अध्यक्ष सनाउल्ल्हा तांबटकर, शहर महासचिव मतीन शेख, शहर कार्याध्यक्ष फिरोज शेख, इमरान शेख, मोसिन शेख, बशीर शेख, सलामन खान, शाहरुख खान, फैजान कुरेशी, अवेज शेख, नवाज कुरेशी,  शहाबाज खान, रमिज शेख, अर्षान सय्यद, वाहाद शेख, मतीन सय्यद, आदी उपस्थित होते. 

कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी एम आय एम युवा शहर अध्यक्ष अमीर खान यांनी विशेष परिश्रम घेतले.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या