जनतेची सेवा हाच एम आय एमचा संकल्प - डॉ परवेज अशरफी
६४ वर्षा पूर्वी मौलाना वाहिदुद्दिन ओवेसी यांनी हैदराबाद येथे एक छोटेसे रोपटे लावले एम आय एम पक्षाची स्थापना केली आणि जनतेला साथ देण्याचे आव्हान केले. त्यावेळची सरकारने हा पक्षाची वाळ होऊ नाहीत यासाठी पक्षाचे अध्यक्ष यांना तुरुंगात टाकले आणि पक्ष संपवण्याचा प्रयत्न केले. परंतु पक्ष अध्यक्ष मौलाना वाहिदुद्दीन ओवेसी यांनी हिम्मत सोडली नाही. सरकारला त्यांना तुरुंगातून सोडावे लागले त्यानंतर पक्षाने हैदराबाद मध्ये होणाऱ्या सर्व निवडणुकात भाग घेण्याचा निर्णय घेतला आणि पक्षाचा विस्तार नगरसेवक ते आमदार, आमदार ते खासदार, असा प्रवास सुरू झाला. हैदराबाद मध्ये सामान्य जनतेचे काम इतक्या प्रमाणात करत आहे की कोणत्याही पक्षाचा असो किंवा सामण्या व्यक्ती त्यांनी दारुस्सालाम येथे आपले काम घेऊन गेले आणि ते झाले नाही असे कधीच घडले नाही. सुलतान सलाउद्दिन ओवेसी यांनी व त्यानंतर बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी आणि अकबरुद्दीन ओवेसी यांनी पक्ष बळकट करण्यासाठी हैदराबाद बाहेर पक्षाचा विस्तार करण्यासाठी आहो रात्र परिश्रम केले. २०१२ साली एम आय एम पक्षाने नांदेडची महानगर पालिका निवडणूक महाराष्ट्रात लढले आणि विजय मिळवला. पूर्ण देशात जनता परियाय शोधत होती तसेच महाराष्ट्राची जनतेला वेगळा परीयाय हवा होता. महाराष्ट्राची विधानसभेत २ आमदार जनतेने पाठून एम आय एम ला पसंती दिली. पूर्ण देशात हैदराबाद मधून एम आय एम पक्षाचा एकच खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब असायचे परंतु औरंगाबादची जनतेने खासदार इम्तियाज जलील साहेबांना संसदेत पाठून आपले प्रेम दाखून दिले. हैदराबाद ते महाराष्ट्र ते बिहार ते गुजरात ते उत्तर प्रदेश पक्षाचा विस्तार होत आहे. महाराष्ट्रात पक्षाचा विस्तार प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील साहेब आणि प्रदेश कार्याध्यक्ष डॉ गफ्फार कादरी साहेब यांच्या नेतृत्वात होत आहे. ज्या प्रकारे बॅरिस्टर असदुद्दीन साहेबांच्या सभेत जनता प्रेम देत आहे आणि युवा पिढी एम आय एमचा साथ देत आहे ते पाहून नक्कीच १० मार्चला एम आय एम उत्तर प्रदेश मध्ये सत्त्तेत निर्णायक भूमिकेत असेल. नक्कीच १० मार्चला पूर्ण देशात एम आय एम कार्यकर्ते जल्लोष करतील अशी अशा एम आय एम जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी यांनी पक्षाची स्थापना दिवसाच्या वेळी बोलतांना व्यक्त केली. अहमदनगर जिल्ह्यात तालुका आणि शहर पातळीवर एम आय एमच्याया स्थापना दिवशी पदाधिकारी आणि कार्यकर्ते वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रम घेण्यात आले. पक्षाचा भविष्य हुजेफा यांचे हातांवे केक कापण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष डॉ परवेज अशरफी, जिल्हा उप अध्यक्ष मुफ्ती अल्ताफ, युवा कार्याध्यक्ष मोसीन खान, युवा महासचिव इम्रान शेख, युवा उप अध्यक्ष ताऊसिफ शेख, संघटक हसन शेख, सोशल मिडिया प्रमुख बशीर शेख, आदी. उपस्थिती होते.
No comments:
Post a Comment