मजूर सोसायट्या एक सोंग
मजूर दोन वेळचे पोटभर जेवायला मिळावे आपले व आपल्या कुटुंबांचे आणि आपणांस दिवसांचा रोजगार दैनंदिन जीवन जगण्यापुरता मिळावी असे आणि एवढ्यावर समाधान मानणारा तो एक मजूर मिळेल ते काम करून कंत्राटदार ठेकेदार देईल तेवढी मजूरी. आपल्या व कामाच्या वेळेपेक्षा जास्त वेळ काम करून घेणा-या बद्दल एक शब्द न बोलणारा तो मजूर. आपले हक्क व अधिकार याची जाणीव नसणारा. समाजात हिण वागणूक मिळणारा तो एक घटक म्हणजे मजूर कामगार सुविधा योजना. कामगार कायदे फायदे. गरिबीमुळे मुलांचे शिक्षण नाही. व्यसन अडाणी गरजू. असा समजला जाणारा घटक म्हणजे मजूर.
शासनाने यासर्व विषयांचा अभ्यास करून मजूरांना आपले हक्काचे वर्षभर काम मिळावे यासाठी मजूर सोसायट्या ही संकल्पना अमलात आणली. यानुसार मजूर एकत्र येऊन आपली स्वताची मजूर सोसायटी उभी करू शकतात. आणि ग्रामपंचायत. पंचायत समिती. जिल्हा परिषद. या माध्यमातून. गावात होणारी विकस कामे. विना अनुदानित भरता घेण्याची तरतूद केली कारण मजूर हा गरिब असल्यामुळे अनामत रक्कम भरु शकत नाही. परवाच्या जिल्हा परिषद निर्णयानुसार ३०/ लाखांपर्यंत असणारे काम कोणतीही अनामत रक्कम न भरता मजूर सोसायट्या यांना देण्याचा निर्णय घेतला. यानुसार कामाचे बिल वेळेवर काढणे. कोणतीही जादा रक्कम बिल मंजूर करण्यासाठी मागणे. हे कायद्यानुसार गुन्हा आहे
मजूर सोसायट्या एक सोंग आहे कारण अमुक अमुक मजूर सहकारी सोसायटी. दिनदयाळ सुतगीरणी. अंत्योदय योजना. यामध्ये. फक्त मजूर हे नाव वापरले आहे. पण खरोखरच मजूर असणारा एकाही मजूर या सोसायटीत सभासद म्हणून नाही. मजूरांचे नावांवर बोगस कागदपत्रे सादर करून स्थानिक पुढारी. नेते. गावातील नामांकित व्यक्ती. यांचे बगलबच्चे मागे पुढे फिरणारे असतानाच गर्भ श्रीमंत अशा मजूरांचे सोंग घेऊन वशिल्याने व आर्थिक अमिष देवून कागदपत्रे रंगवून विविध गावांत. तालुक्यात. जिल्ह्यात. मजूर सोसायट्या काढल्या आहेत अशा मजूर सोसायट्या यांचें नावे टेंडर ठेकेदार घेवून ते कामे करतात. या टेंडरची कामाची गुणवत्ता कामकाज जगजाहीर आहे. अशा या सोंगाड्या मजूरांची काम करण्याची पद्धत फक्त पैसा मिळविणे एवढाच उद्देश आहे त्यामुळे गावा गावात होणारी विकास कामे. अगदी निकृष्ट दर्जाची होणार आहेत आणि केली जातात. यामुळे शासनाचा विकासाचा असणारा उदेश कोठेतरी अपुरा पडत आहे. अशा या सर्व चोरांच्या मुळे आम्हा खरोखरच मजूर असणार्या लोकांची कष्टाची भाकरी हिसकावून घेतली जाते आहे म्हणून जिथे मजूर सोसायट्या आहेत त्यात सर्व मजूर सभासद पाहिजेत
आपल्या जिल्ह्यात असणार्या सर्व मजूर सोसायट्या यांचेत असणारे पदाधिकारी वगैरे यांची नावे गाव चावडी वाचन करण्यात यावी त्यामुळे खरोखरच यात कामगार / मजूर आहेत का हे सर्व सामान्य माणसाला कळेल आणि संबंधित चौकशी करावी. मजूरांचे सोंग घेतलेल्या बलाढ्य गर्भ श्रीमंत पुढारयाचे बगलबच्चे त्या त्या मजूर सोसायट्या मधून कायदेशीर कारवाई करून काढून टाकण्यात यावे. आणि त्याजागी गावातील खरया खुरया मजूरांना पदाधिकारी नेमून सोसायट्या चालू कराव्यात तसेच आम्ही मजूर शासनाकडे मजूर सोसायट्या स्थापन करण्याबद्दल जो प्रस्ताव दाखल करू त्याचा सहानुभूती पूर्वक अधिकारी व कर्मचारी यांनी विचार करावा तसेच प्रस्थापित मजूर सोसायट्या मध्ये आम्हा मजूरांचा शासनाने पुढाकार घेऊन सहभाग वाढवावा
घरबांधणी करिता जरूरी असणारी वाळू दगड माती या बाबी संबंधितांना सुलभतेने मिळाव्यात अशा स्वरूपाची प्रशासकीय कार्य प्रणाली अमलात आणावी
कामगार/ मजूर यांना त्रासदायक ठरणारे कामगार कायदे व त्यामधील तरतूदी नष्ट करणे जरुरीचे आहे यासाठी प्राथमिक तयारी म्हणून कामगार कायदेतील कामगारांना अनाठायी त्रासदायक बाबी कोणत्या ? याचे संबोधनासाठी शासनाने " अभ्यास गट " नेमून त्याची शिफारस घेवून सर्व ती चर्चा करून निर्णय घ्यावा
कामगार / मजूर यांना नियमानुसार वेतन मिळत नाही याकरिता संबंधित कामगार / मजूर अधिकारी व कर्मचारी यांनी यथायोग्य कारवाई करावी किमान वेतन प्राप्ती साठी कामगारांचे / मजूरांचे अभ्यास शिबीर घ्यावे आणि कामगार / मजूर हितासाठी असणारे कल्याणकारी योजना व कायदे कलम हक्क व अधिकार यांची माहिती द्यावी
म गांधी स्वयंरोजगार योजना. पंतप्रधान आवास योजना. इंदिरा आवास योजना. रमाई आवास योजना. ठक्कर बाप्पा आदिवासी विकास. इ शासकीय कामांचे कंत्राट आम्हा खरे खुरे कामगार मजूरांना अगर मजूर गट किंवा मजूर सोसायट्या यांना मिळावीत. तशी संबंधीतांना सूचना देण्यात यावी
आम्ही स्वच्छतेचे पाईक आहोत त्यामुळे प्रशासनाने. प्रसंगी आमची मदत म्हणून. ग्रामपंचायत. नगरपरिषद. महानगरपालिका. यामधील स्वच्छता अभियान ठेके मजूर सोसायट्या यांना देण्यात यावे.
" वाळू माफिया" आणि" अधिकारी व कर्मचारी यांचे लागेबांधे " यातून वाढलेली वाळू बेकायदेशीर उपसा नष्ट करण्यासाठी. मा जिल्हाधिकारी सो जिवाच्या आकांताने प्रयत्न करित आहेत त्यांना सर्वांनी साथ देण्याची प्रामाणिक शपथ घ्यावी यामुळे दगड वाळू माती अशा गौणखणिज उपलब्धता वाढून बांधकाम शेत्रावर अवलंबून असणारे कोट्यवधी कामगार यांना पुरेसा रोजगार मिळेल
मजूर सोसायट्या बदल मोठे मोठे नेते पुढारी वेळोवेळी भाषन करत असतात पण आत्ता खरी गरज आहे ती म्हणजे खरोखरच असणारे कामगार व मजूर यांचे खरोखरच कल्याण करायचे असेल तर विविध सहकारी सोसायट्या मध्ये खोटे सभासद व अधिकारी व कर्मचारी असणारे काढून टाकून प्रामाणिकपणे काम करणारे कामगार व मजूर यांची नोंदणी करावी. कामगार व मजूर यांच्या कडून होणारी विविध विकास कामे जास्त पैसा मिळविण्यासाठी नाही तर फक्त दोन वेळचे जेवण मिळाले आपले कुटुंब व आपण जगण्यापेक्षा जास्त इच्छा कामगार व मजूर यांची असणार नाही
आप आपल्या गावात तालुका जिल्हा येथे असणार्या मजूर सोसायट्या चालू आहेत का ? किती आहेत ? बंद किती आहेत ? त्यात खरेखुरे मजूर सभासद आहेत का ? याची चौकशी करा. आणि गोरगरिबांचा न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावा
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
No comments:
Post a Comment