चोराच्या उलट्या बोंबा

 

चोराच्या उलट्या बोंबा 

                        आपल्या देशातील कामगार संघटना वेतन वृधदिचा जसा आग्रह धरतात त्या प्रमाणे कामगारांनी आपले कर्तव्य चोखपणे बजावून अधिक उत्पादने करावे अस प्रयत्न करीत नाहीत. जे कामगार नेते. सहहयक कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी. अशा तर्हेने प्रयत्न करतात त्यांचे नेतृत्व कामगार झुगारून देतात असाही अनुभव आहे. आपल्या कामगार संघटना अनेकदा यांत्रिकीकरणाला विरोध करतात कारणं त्यामुळे कामगार कपात होईल अशी त्यांना भीती वाटते. कामगारांच्या या दृष्टिकोनामुळे उधोगधंदे आधुनिकीकरण मध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत कामगार संघटनावरील अशा प्रकारचीं टीका एकतर्फी आहे असे गृहीत धरले तरी कामगार संघटनातील फाटाफूटीमुळे कामगारांचे मोठे नुकसान होत असताना आपणांस पाहावयास मिळते. हे मान्य करण्यास हरकत नाही. कामगार संघटनातील दुफळी मुळे कामगारांचे अनेक संप व चळवळी अयशस्वी झालेल्या आहेत. काही कामगार संघटना अवास्तव स्वरूपाच्या आणि केंव्हाही मान्य होणार नाही आशा मांडण्याचा आग्रह धरतात. काही वेळा मालक लोकांना अनुकूल अशा वेळी म्हणजे मालाला उठाव नसेल अशा वेळी संप घडवून आणून कामगार नेते संघटना सेवाभावी संस्था युनियन कामगारांना सोडून मालक वर्गाला मदतच करतात. एवढेच नव्हे तर याबाबतीत कामगार नेते व मालक वर्ग यांच्यामध्ये अनेकदा संगनमत असते. करार करण्याच्या वेळी कामगार नेते पैसे घेऊन मालक वर्गाच्या फायदा होईल अशा प्रकारचें करार कामगारांवर लादतात अशा प्रकारचीं टीकाही केली जाते या सर्व गोष्टी मध्ये किती प्रमाणात सत्य असेल ते ठामपणे सांगता आलें नाहीं तरी अनेक कामगार संघटना व त्यांचे नेते यांच्या बाबत यासंबंधी संशयाचे वातावरण निर्माण झालेले आहे हे नाकारता येणार नाही

              आपल्या पुष्कळशा कामगार संघटना व कामगार नेते. कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी यांनी कामगारांना पक्षाच्या दावणीला बांधले आणि त्यांच्या माध्यमातून आपले धोरणं साध्य करण्यासाठी व राजकीय कारणांसाठी बंद आंदोलन मोर्चा अशा प्रयोजनासाठी या कामगारांना राजकीय पक्षांमुळे भाग घ्यावा लागतो शिवाय कामगार संघटना व बांधकाम कामगार संघटनातील निर्णय देखील लोकशाही पध्दतीने घेतलें जात नाहीत. प्रत्येक कामगार संघटना एखाद्या नेत्याच्या. इशारयावर चालते. त्यामुळे सामान्य कामगारांना संपामधये. आंदोलन मोर्चा यामध्ये सहभागी व्हायचे नसले तरी त्याचा त्या बाबतीत इलाज राहत नाही 

             बांधकाम कामगार यांच्यासाठी कामगार कल्याणकारी मंडळांची स्थापना करण्यात आली आहे त्यानुसार बांधकाम कामगार यांच्यासाठी सामाजिक आर्थिक शैक्षणिक वैद्यकीय अशा विविध १९ कल्याणकारी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. नोंदणीसाठी वयोमर्यादा १८/६० वयोगटातील लोकांना नोंदणीसाठी परवानगी आहे. त्यासाठी ६० वार्षिक फी आकारली जात आहे. यासाठी बांधकाम कामगार आहे हे सिद्ध करण्यासाठी इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार यांचा ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. 

        कामगार संघटना व राजकीय संघटना. सामाजिक संघटना. सेवाभावी संस्था युनियन यांना उत आला आहे. आणि यांच्याकडून नेमण्यात आलेले अध्यक्ष उपाध्यक्ष. एजंट दलाल यांना उत आला आहे. कल्याणकारी मंडळाकडून बांधकाम कामगार नोंदणी करण्यासाठी विविध नोंदणी पध्दती अवलंबली जाते. त्यानुसार. कामगार अधिकारी समोरा समोर. गठ्ठा पध्दती. एजंट यांच्यामार्फत होणारी. यामुळे प्रत्येक गावात तालुका जिल्हा राज्य देश यामध्ये बोगस कामगार नोंदणी भरमसाठ झाली आहे म्हणजे या सर्व प्रकरणाला जबाबदार आहे ते म्हणजे इंजिनिअर आणि फक्त इंजिनिअर आणि आत्ता चालू असणारी आॅनलाइन पध्दतीने नोंदणी. यामध्ये तर आज संघटना सेवाभावी संस्था युनियन राजकीय संघटना सामाजिक संघटना. यांनी बांधकाम कामगार यांना विविध लाभ मिळवून देण्यासाठी बांधकाम कामगार यांना लुटायला चालू केले आणि यासाठी सहहयक कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी यांना हाताला धरून तुम्ही खा आणि आम्हाला खाऊ द्या. असा फंडा आज प्रत्येक ठिकाणी वापरला जात आहे. म्हणजे सायकलवर असणारे चारचाकी गाडी मध्ये गेले. काहीजण राजकारणात राजकीय नेत्यांच्या जोडीला दिसायला सुरुवात झाली ते फक्त कामगारांच्या जीवांवर. आणि कामगार आयुक्त भवन मधील अधिकारी व कर्मचारी यांच्या कामचुकार पणामुळे. बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांचे लाभ बोगस कामगार घेत आहेत 

                दोन दिवस झाले वृतमानपत्रात दुरदरशन वर. वाचत आहोत पाहत आहोत की जागोजागी नेते. कामगार आयुक्त यांनी आपल्याला बांधकाम कामगार यांचा कळवळा असल्याचा आव आणत आहेत त्यानुसार बांधकाम कामगार यांनी शासकीय योजनेचा लाभ घ्या सापेक्ष पणे लाभ घ्या. कोणीही बांधकाम कामगार यांना नोंदणी खेरीज जादा पैसे मागत असेल तर त्याची सहहयक कामगार आयुक्त भवन मध्ये तक्रार करा. असे बिन बुडाचे बोलणें चालू आहे. म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा म्हणलं तरी वावगे ठरणार नाही. कारणं संघटना कामगार नेते सेवाभावी संस्था युनियन यांच्याशी अधिकारी व कर्मचारी यांचे संगनमत आहे. कामगार कार्यालयात आज सुध्दा कामगार संघटना एजंट यांनी ठिययाच मारला आहे. त्यांना बसणयास जागा देणारे कोण. प्रत्येक संघटना सेवाभावी संस्था युनियन एजंट याचा फोन नंबर कामगार आयुक्त भवन मध्ये काम करणारे अधिकारी व कर्मचारी ठेकेदार पध्दतीने काम करणारे यांच्याकडे कशासाठी. कामगार आयुक्त भवन मधील मिटींगा सभा. अंतरंग बाब आगोदर संघटना सेवाभावी संस्था युनियन एजंट यांना अगोदरच कळत कस. ठराविकच संघटना सेवाभावी संस्था युनियन यांनाच मिटिंगमध्ये बोलावले जाते ही बाब कोणी अमलात आणली. माहिती अधिकार दाखल केला तर एकच फंडा जनमाहिती अधिकारी यांनी घेतला आहे की आपण जर जिल्ह्यातील कामगार नोंदणी. नोंदणीसाठी किती इंजिनिअर यांनी दाखले दिले. बांधकाम कामगार यांच्यासाठी वितरित करण्यात आलेला लाभ त्याची रक्कम. लाभार्थी नाव मोबाईल नंबर सह माहिती द्या. आशी कोणतीही माहिती मागितली तर या सहहयक कामगार आयुक्त यांच्याकडे एकच उत्तर असतं ते म्हणजे ही सर्व माहिती वैयक्तिक स्वरूपाची आहे. त्रेयसत पक्षाने ही माहिती देण्यात येऊ नये यासाठी आमच्याकडे लेखी व मौखिक स्वरूपाची तक्रार केली आहे. पण त्याबाबतचे कोणतेही पत्र दिले जात नाही. म्हणजे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हेच संघटना सेवाभावी संस्था युनियन एजंट यांना पाठीशी घालत आहेत हे खरे आहे म्हणजे अधिकारी व कर्मचारी यांना बांधकाम कामगार यांच्या लाभातील किंती हिस्सा दिला जातो. वैयक्तिक नोंदणी करणारे कामगार यांना आज दोन तीन महिने नोदणी मॅसेज येत नाही आणि संघटना सेवाभावी संस्था युनियन एजंट यांनी नोंदणी केली की एका दिवसात त्यांच्या बांधकाम कामगार यांना नोंदणी मॅसेज येतो तो कसा म्हणजे बोगस कामगार नोंदणी साठी जेवढे इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार जबाबदार आहेत तेवढेच अधिकारी व कर्मचारी सुध्दा जबाबदार आहेत. 

            म्हणजे इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार यांची तर चौकशी झालीच पाहिजे कारणं एक इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार किती कामगार नोंदणी साठी दाखले देणे असा कोणताही नियम नाही बांधकाम कामगार यांना नोंदणी मॅसेज कधी येईल याचा कोणताही निर्धारित कालावधी नाही. म्हणजे सर्व काही बिन बुडाचे बोलणें चालू आहे नोंदणी साठी दाखले देणारे इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार यांनी बांधकाम कामगार त्यांच्याकडे ९० दिवस काम केल्याचे हजेरी पत्रक जोडणे बंधनकारक करा. कामगारांचा पगार हातोहात देत असेल तर तसं शपथ पत्र करा. बॅंकेकडून पगार देत असेल तर बॅंक डिटेल्स जोडणे बंधनकारक करा. बांधकाम कामगार त्याला देण्यात येणारे सुरक्षा संच घालून काम करत असलेला कामगारांचा फोटो लाभाच्या वेळी अर्ज भरतांना अनिवार्य करा. हे करायचं सोडून सहहयक कामगार आयुक्त अधिकारी व कर्मचारी बांधकाम कामगार यांनी योजनांचा लाभ घ्या म्हणून सांगत आहेत कस शक्य आहे. बोगस कामगार नोंदणी साठी जबाबदार अधिकारी व कर्मचारी सुध्दा आहेत. सहहयक कामगार आयुक्त यांनी एकही संघटना सेवाभावी संस्था युनियन महिला संघटना यांचे पदाधिकारी किंवा कोणतेही कार्यकर्ते यांनी सहहयक कामगार आयुक्त भवन चे आवारात सुध्दा यायचं नाही फक्त आणि फक्त कामगार यांनाच परवानगी आहे अशी बातमी दिली कां ? नाही कारण या सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे दुकान बंद होणार तुम्हाला जर खरोखरच बोगस कामगार नोंदणी थांबावी असं वाटतं असेल तर आजच इंजिनिअर ठेकेदार कंत्राटदार यांच्या चौकशीचे आदेश काढा. संघटना सेवाभावी संस्था युनियन महिला संघटना यांची चौकशी लावा. कामगार आयुक्त भवन मध्ये येणारी सर्व नोंदणी. लाभाचे अर्ज विहित वेळेत निकालात काढा. 

          इ श्रम कार्डची नोडल एजन्सी म्हणून परवानगी बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर यांनी मागितली होती पत्र दाखल करून आज दोन महिने झाले पत्र आहे त्याच काय केले हे सुद्धा आम्हास कळविण्यात आले नाही म्हणजे आपणं किती कर्तव्य क्षम आहात हे कळत. 

          समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी

बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर

रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा

रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा

मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा

भ्रष्टाचारविरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष

संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे

९८९०८२५८५९

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या