बुध्द कृष्ण
प्राचीन वा पुराणकाळात विभूतीचया प्रतिमा तयार होतात असे नाही नजिकच्या इतिहासातील किंवा अगदी वर्तमानकालीन कर्तबगार व्यक्तिंना ही. म्हणता म्हणता राजकीय व्यक्तिच्या अंगात अशा विविध विभूती चे वलय प्राप्त होते. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाकडे दृष्टीक्षेप टाकला असता अनेक इतिहास पुरुषांच्या अशा विभूतीप्रतिमा वेळोवेळी तयार होत गेल्याचे आपल्याला माहीतच आहे. स्वातंत्र्योत्तर काळातही राष्ट्र उभारणीच्या आणि बांधणीच्या संदर्भात किंवा सामाजिक न्यायाच्या प्रसथापनेचया संदर्भात ज्या कर्तबगार नेत्यांनी मोलाची भूमिका बजावली त्यांनाही प्रचलित राजकारणाच्या प्रक्रियेत राजकीय विभूति तत्व वलय प्राप्त झाल्याचे आपण पाहतोच या दृष्टीने पाहता शिवाजी. ज्योतिबा फुले. महात्मा गांधी. स्वातंत्र्यवीर सावरकर. डॉ बाबासाहेब आंबेडकर. इत्यादी विभूतीचया प्रतिमा कशा तयार होत गेल्या व आधुनिक भारतीयांच्या राजकीय मानसिकेतेचा पोत कसा विणला गेला हे पाहणे उद्बोधक ठरेल
भारतीय राजकारणात गांधी युगात काही उदारमतवादी व प्रागतिक नेत्यांनी अहिंसक जीवननिष्ठा मानणारा विवेकवादी. समतावादी व शांतिवादि अशा प्रतिमा आपल्यापुढे उभ्या राहिल्या. स्वातंत्र्यततोर काळात आपले विवेकवादी व शांतिवादी राजकारण प्रक्षेपित करण्यासाठी पंडित नेहरुंनी सातत्याने आश्रय घेतल्याचे दिसतें
तथापि राम आणि कृष्ण यांच्या तुलनेत बुध्दाच्या विभुती प्रतिमेचा राजकीय क्षेत्रातील वापर हा तसा आंबेडकर चळवळीचा वारसा म्हणलं पाहिजे. आंबेडकरांचा धर्मांतर मुद्दा चळवळी मुळे बुध्दाची प्रतिभा ही समाजातील शोषित. दलित. आर्थिक दुर्बलता. अशा वर्गाच्या अस्मितेशी जोडली गेली. त्यानुसार वैदिक कर्मकांड निषेध करणारा. श्रध्दा असावी पण अंधश्रद्धा नसावी. समता बंधुता. नैतिक अश्या विविध कर्मकांडाचा निषेध करणारा संदेश दिला. शोषण मुक्तीसाठी विविध मार्ग सांगितले प्राण्यांचे शोषण व हत्या करू नका. अन्याय करू नका. खोटे बोलू नका. मानवाला कोणाचीही हत्या किंवा शारीरिक मानसिक शोषण करण्याचा अधिकार नाही तसे केल्यास तो घोर अपराध आहे. मैत्री व करूणेचा संदेश देणारा बुध्द हा भारतातील वर्ण. जातीप्रथाक काळा गोरा. वंचित. दलित. अशयपृश. अशा व्यवस्थेच्या विरोधात बुध्द उभा केला आहे. व या देशातील सर्व वर्ण भेद. जात भेद विद्रोही परंपरेचा जनक बुध्दच ठरला
विवेकवादी बुद्ध आणि विद्रोही बुद्ध याचबरोबर बुध्दाची आणखीही एक प्रतिमा गांधींच्या अहिंसावादाचे तात्विक खंडण करणार्या काही हिंदुत्ववादी नेत्यांनी विशेषत गांधीयुगाचया काळात उभी केल्याचे दिसते त्यानुसार अहिंसक अतिरेक करून पौरूषच खच्चीकरण करणारा. शांति वादाचे स्तोम माजवून राष्ट्रीय अस्मिता खुरटी करणारा. जशास तसे या रूढ वादाने न वागता न्यायाने वागा. असतयाला सत्याने. क्रोधाला अक्रोधाने. हिंसेला अहिसेने. कारपनयाला दानाने जिंकण्याचे. उफराटे अति आदर्शवादी व पर्यायाने अव्यवहारी विचार सांगणारी विभुती म्हणजे बुध्दाची प्रतिभा आजच्या राजकारणात रेखाटलेली दिसतें. परिणामी राजकारणात बुधदापेक्षा. कृष्णा किंवा चाणक्य बरा. अशा निषकशा पर्यंत काहीजण येवून पोहचतात
तात्पर्य राम. कृष्ण किंवा बुध्दा सारख्या विभूतीचया अशा विविध प्रतिमा राजकीय प्रक्रियेमध्ये तयार होत राहतात त्यामागे बदलते हितसंबंध कार्यरत असतात आणि आपणही आपल्याला राजकीय हितसंबंध व अशा आकांक्षेप्रमाणे ह्या प्रतिमा राजकीय व्यवहाराचे एक साधनं म्हणून वापरत असतो
कृष्णाची प्रतिमा भारतीय राजकारणात वापरली गेल्याची दिसतें. विशेषत स्वातंत्र्यपूर्व काळात कृष्ण प्रतिमेचा व त्याने दिलेल्या गीता तत्वज्ञानाचा वापर तत्कालीन राजकारिता झाल्याचे सहजच लक्षांत येईल न्यायासाठी. गोरगरीब जनतेसाठी. सज्जनांच्या रक्षणासाठी युध्दाचा संदेश देणारया व गीते द्वारे निष्काम कर्माचा उपदेश करणार्या कृष्ण प्रतिमेचा वापर स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अरविंद घोष. लो टिळक. प्रभूतीचया केल्याचे आपण जाणतोच. याबरोबरच अनासक्ती योगाचा प्रवकता. उप युकतिवादाचा समर्थक. देहमायाभंगाचा संदेश देणारा. स्थित प्रज्ञ अशाही कृष्ण प्रतिमा. अनुक्रमें महात्मा गांधी. स्वातंत्र्य विर सावरकर. सेनापती बापट. आचार्य विनोबा भावे. यांच्या लिखाणातून निर्माण झाल्याचे दिसते
स्वातंत्र्योत्तर काळात भूदान चळवळीमध्ये. सब भूमी गोपालकी. या सूत्रांच्या आधारे विनोबांनी कृष्ण प्रतिमेचा कल्पकतेने वापर केला तर लोहियानी. राम हा उत्तर दक्षिण एकतेचा दुवा आहे व कृष्ण हा पूर्व पश्चिमेचा. अशा प्रकारचीं मांडणी करून भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेचा आधार कृष्णाच्या चरित्रादवारे स्पष्ट केला व कृष्णाची वेगळीच प्रतिभा सिध्द केली. यावरून या सर्व कृष्ण प्रतिमा आपले राजकीय मानस घडविण्याचे कमी अधिक प्रमाणात कशा कार्यरत झाल्या आहेत हे स्पष्ट होते
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार जाहिरात प्रसिद्ध वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९
No comments:
Post a Comment