चित्रकार प्रमोद रामदिन यांच्या आठवणींना उजाळा देत ‘यादें’ कार्यक्रमांनी स्वरांजली

 



रहने को सदा दुनिया में आता नही कोई

तुम जैसे गये, ऐसे भी जाता नाही कोई

-डॉ.कमर सुरुर


अहमदनगर - कोविड या महामारीने जग बदलून टाकले आहे. त्याचबरोबर आमच्या जवळचे अनेक चांगली माणसे आम्हाला सोडून गेली आहे. पण काही माणसे अशी असतात की ते गेल्याचे मन स्विकारायला तयार नसते. यापैक एक नाव म्हणजे हरहुन्नरी कलाकार चित्रकार प्रमोद रामदिन. जे फक्त चित्रकारच नव्हते तर एक शिक्षक, गायक, संग्राहक व अशो कलांनी परिपूर्ण व्यक्तीमत्व होते. त्यांच्या अकस्मिक निधनाने अहमदनगरकरांना मोठा धक्काच बसला आहे. त्यांच्या जाण्यांनी जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कधीही भरुन निघणार नाही, असे भावनिक उद्गार प्रसिद्ध कवियत्री डॉ. कमर सुरुर यांनी व्यक्त केले.

चित्रकार प्रमोद रामदिन यांच्या आठवणींना उजाळ देण्यासाठी गाता रहे मेरा दिल ग्रुपच्यावतीने ‘यादें प्रमोद रामदीन सरांची’ या स्वरांजली कार्यक्रमाचे रहेमत सुलतान सभागृहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. कमर सुरुर बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून संगीतप्रेमी कुबेर पतके, संदिप भुसे, सईद खान, सहदेवजी आदि उपस्थित होते. 

यावेळी हिंदी गीतांची महेफिलमध्ये रामदिन सर यांनी किशोर कुमार यांची गायलेली गाणी अ‍ॅड.अमीन धाराणी, अपर्णा बालटे, समीर खान, सारिका रघुवंशी, अ‍ॅड.गुलशन धाराणी, किरण उजागरे, डॉ.रेश्मा चेडे, गणेश सब्बन, सुनिल भंडारी, मनोज डफळ, निता माने, संजय माळवदे, विकास खरात, दिनेश मांजरेकर, डॉ.संतोष चेडे, संदिप भुसे, डॉ.सत्तार सय्यद, राजू सावंत, अनिल आंबेकर यांनी सादर केली. प्रारंभी स्व.रामदिन सरांबद्दल त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमास सरांवर प्रेम करणार्‍या अनेकांनी हजेरी लावून भावूक मनाने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

--------

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा

  सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय संस्था शोधून दाखवा            अनुसूचित जाती जमाती. इतर मागासवर्गीय जाती जमाती. भटक्या विमुक्त...

सर्वाधिक वाचलेल्या बातम्या