मानसिक भान हरवलेला दिपक उपचारानंतर कुटुंबात
अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथे ऐन लॉकडाऊन मध्ये दि. १०/०४/२०२० रोजी बेवारस मनोरुग्ण तरुण सैरावरा फिरत असल्याचे अकोले पोलिसांना समजले. अकोले पोलेसांनी या मानसिक भान हरवलेल्या तरुणाला श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाच्या *मानवसेवा* प्रकल्पात दाखल केले होते. संस्थेने या निराधार तरुणावर मानसोपचार तज्ञ डॉ. अनय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने उपचार देवून समुपदेशन केले. या तरुणाकडून मिळालेल्या माहितीचा आधार घेत श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुुंजाळ यांनी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस स्टेशनचे कॉंस्ट्रेबल मा. श्री पगारे यांना दिपकबद्दल माहिती दिली. त्यावरुन श्री पगारे यांनी दिपक हा औढेंवाडी ता. सिन्नर जि. नाशिक येथील आहे असा अंदाज व्यक्त करत त्या गावातील पोलीस पाटील श्री नाना कुंदे यांचा मोबाईल नंबर दिला. दिलीप गुंजाळ यांनी औढेंवाडीचे पोलीस पाटील श्री नाना कुंदे यांना संपर्क करुन या तरुणाने सांगितलेली माहिती दिली, आणि मानसिक भान हरवलेला दिपक औंढेवाडी येथील गरीब आदिवासी कुटुंबातील असल्याची खात्री पटली. दि. २ नोव्हेंबर २०२० रोजी दिपक या तरुणाला घेवून श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळाचे संस्थापक दिलीप गुंजाळ, राहुल शिरसाठ, सिराज शेख, विकास बर्डे हे उंच उंच डोंगर, द-याखो-यातून मार्ग काढत या छोट्याशा गावात पोहचले. मानसिक भान हरवलेल्या दिपकला उपचारानंतर कुटुंबाच्या व ग्रामस्थांच्या ताब्यात देवून कायमस्वरुप पुनर्वसन केले.
वडीलांचा मृत्यु मनाला चटका लावून गेला
वडीलांच्या अचानक झालेल्या निधनानंतर दिपकला मोठा मानसिक धक्का बसला होता. आणि या धक्यामुळे निराधार दिपकने आपले घर व गाव सोडले होते. कुटुंबातील व्यक्ती व गावकरी यांनी दिपकचा शोध घेतला पण सापडला नाही अखेर आज मानवसेवा प्रकल्पामुळे या तरुणाला आपले कुटुंब व गाव पुन्हा मिळाल्याची प्रतिक्रीया पोलीस पाटील श्री नाना कुंदे यांनी दिली. संस्थेचे आधारस्तंभ श्री शशिकांत चंगेडे, श्री संजय शिंगवी, श्री अविनाश मुंडके, श्री नाना भोरे, श्री संजय खोंडे यांच्या मार्गदर्शनाने निराधार मनोरुग्ण तरुणाला पुन्हा जीवनाची नवी दिशा मिळाली. मानवसेवा पुनर्वसन कार्यात संस्थेचे स्वयंसेवक अंबादास गुंजाळ, सिराज शेख, राहूल साबळे, प्रसाद माळी, अशोक मदणे, अनिता मदणे यांनी परिश्रम घेतले.
"मानवसेवा हीच, ईश्वर सेवा!"
*मानवसेवा प्रकल्प*
(मन व घर हरवलेल्या मानसांच हक्काच घर)
श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ
वाचा -
अर्णब गोस्वामी को किया गिरफ्तार...
अर्णब गोस्वामी मामलेमे पत्रकार संघटना सच के साथ......
No comments:
Post a Comment